vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

जिल्हा क्रीडा संकूलातील अथलेटिक्स खेळ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक नियुक्तीसाठी 31 मे पर्यंत अर्ज करा- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

जिल्हा क्रीडा संकूलातील अथलेटिक्स खेळ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक नियुक्तीसाठी 31 मे पर्यंत अर्ज करा- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

सांगली, प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या खेलो इंडिया या योजनेमधून देशभरामध्ये विविध खेळाची प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. सांगली जिल्ह्यासाठी अॅथलेटिक्स खेळाचे प्रशिक्षण केंद्र जिल्हा क्रीडा संकूल येथे मंजूर करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी मानधन तत्वावर प्रशिक्षक नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी दि. 31 मे 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

प्रशिक्षकासाठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे असून मैदानी (अॅथलेटिक्स) खेळातील किमान राज्यस्तरीय खेळाडू बी.पी.एड / एम.पी.एड सह प्रशिक्षणाचा 10 वर्ष अनुभव असणारी व्यक्ती अर्ज करू शकतील. अर्जाचा नमुना व पात्रतेचे निकष जिल्हा क्रीडा कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत क्रीडा कार्यालयामधून अर्ज घेवून दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी क्रीडा कार्यकारी अधिकारी (प्रशिक्षण) नरेश सावंत यांच्याशी 9604813881 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. बोरवडेकर यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीनेविविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये महाराष्ट्राला पदक मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्य स्पर्धे’चे थाटात उद्घाटन

राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन व टेनिक्वाईट स्पर्धेचा समारोप…

vishwatmaklokswamivarta

क्रीडासह अनेक क्षेत्रात महाराष्ट्राकडून देशाचे नेतृत्व – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन पुरस्कार विजेत्यांनी राज्यातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रम

धारावी विभागात भाजपा आणि चेंजर बॉईज कबड्डी टीम* यांच्या वतीने दोन दिवसीय *भव्य कबड्डी स्पर्धा* चे आयोजन

vishwatmaklokswamivarta