vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राचा सलग तिसरा विजय क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राचा सलग तिसरा विजय-क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन

राज्य प्रतिनिधी मुंबई– खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून अभुतपूर्व विजय मिळविला आहे. या ऐतिहासिक यशाचे मानकरी असलेल्या विजेत्यांचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अभिनंदन केले.

बिहार येथे ४ ते १५ मे दरम्यान पार पडलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत एकूण १५८ पदकांसह ५८ सुवर्ण, ४७ रौप्य व ५३ कांस्य पदक मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले. तिरंदाजी, मल्लखांब, जलतरण, कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स अशा २६ क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल क्रीडा मंत्री भरणे यांनी खेळाडुंचे अभिनंदन केले आहे.

ही कामगिरी म्हणजे खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, संघटनांचे योगदान आणि पालकांचे प्रोत्साहन यांचे फलित आहे. राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून मी सर्व खेळाडूंना, प्रशिक्षकांना आणि पालकांना शुभेच्छा देतो, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्यात अडकल्या 5 महिला अन् 2 लहान मुलं यांना सुखरूप बाहेर काढले

vishwatmaklokswamivarta

चाकण एमआयडीसीतील रस्ते व पायाभूत सुविधांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी रस्ते, वाहतूक, पावसाच्या पाण्याचा निचरा, अतिक्रमणे व पार्किंगच्या प्रश्नांचा घेतला आढावा; कालबद्ध उपाययोजनांच्या सूचना

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रची तात्काळ कर्ज योजना

कुष्ठरोगविषयक संदेश देणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद..

vishwatmaklokswamivarta

रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक**जुईली महेंद्र दळवी यांचे नामनिर्देशन पत्र मागे*

सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश* दहावी, बारावी परीक्षेच्या तयारीचा घेतला आढावा* बुलढाण्यात बारावीच्या ३४,६३५ विद्यार्थ्यांची परीक्षा ; ११६ परीक्षा केंद्र…

vishwatmaklokswamivarta