vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप…

राज्य प्रतिनिधी यवतमाळ, : वनहक्‍क कायदा २००६ च्‍या अंमलबजावणी अंतर्गत जिल्‍हास्‍तरीय वनहक्‍क समितीने मंजुरी दिलेल्‍या केळापुर उपविभागामधील केळापुर, घाटंजी व झरी जामणी या तालुक्‍यातील १४ वैयक्‍तिक वनहक्क दावे धारकांना आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आयोजित या वितरण कार्यक्रमप्रसंगी आ.राजू तोडसाम, आ.किसन वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमित रंजन, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, पुसदचे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे उपस्थित होते.

यावेळी केळापूर, घाटंजी, झरी जामणी तालुक्यातील लाभार्थ्यांना डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते पट्टे वाटप करण्यात आले. त्यात कमलाकर कनाके, धर्मा पेंदोर, नागोराव आडे, महादेव पेंदोर, नागोराव चिकराम, जनाबाई कुळसंगे, पुरुषोत्तम तोडसाम, ज्ञानेश्वर सिडाम, समदुराबाई कनाके, गजानन मेश्राम, माधव मेश्राम, धर्मा सोयाम, मारोती मरस्कोल्हे, लखमा आशाम या लाभार्थ्यांना वनहक्क पट्टे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचे सहायक महसूल अधिकारी विलास वानखेडे , जिल्‍हा वनहक्क व्‍यवस्‍थापक रुपेश श्रृपवार, तालुका वनहक्क व्‍यवस्थापक नितीन राठोड व शैलेश कणेर हे उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री कार्यालय (जनसंपर्क कक्ष)मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प,सामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा; ग्लोबल मुंबईचा शुभारंभ- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 7 मे रोजी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची  

एन.डी.ए.,सी.डी.एस.परीक्षा 13 एप्रिल रोजी4447 उमेदवारांची बैठक व्यवस्था..

करजगी बालिका अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल,खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणार-महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर- ⁠करजगी घटनेचा घेतला आढावा- पीडितेच्या कुटुंबाला दिला धीर- ⁠पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची ग्वाही..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील नालेसफाईची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी उपमहापौर व आयुक्तांसह केली प्रत्यक्ष पाहणी

रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याचा राग मनात ठेवून सरपंच पिता पुत्राकडून शिक्षकाला मारहाण!लोखंडी हुकने डोक्यात वार, जिवे मारण्याची दिली धमकी; वरखेडा सिंदखेड येथील घटना…