vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नोंदणी सुरु:वेळापत्रकानुसार नोंदणी करण्याचे आवाहन

अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नोंदणी सुरु:वेळापत्रकानुसार नोंदणी करण्याचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन नोंदणी सुरु झाले असून दि. 6 मे 2025 च्या शासन निर्णयानुसार मार्गदर्शक सुचना देण्यात आले आहेत. या सूचनांचे सर्व शाळा व महाविद्यालयांनी काटेकोरपणे पालन करावे. तसेच जाहिर वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी(माध्य) यांनी केले आहे.

जिल्ह्यातील 344 उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांची प्रवेश प्रक्रिया नोंदणी ऑनलाइन होणार असून ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया होणार नाही. प्रवेश प्रक्रिया संदर्भात पोर्टलवर वेळापत्रकानुसार नोंदणी करणे अनिवार्य आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पंचायत समितीस्तरावर समग्र शिक्षा अभियान कार्यालय येथे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संदर्भात नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन करतील.

 केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नोंदणी वेळापत्रक जाहिर-  दि. 19 मे 2025 रोजी सकाळी 11 पासून 20 मे 2025 च्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र उपलब्ध राहिल. (सत्र केवळ सरावासाठी असून, यामध्ये भरलेली माहिती 20 मे रोजी मध्यरात्री पोर्टलवरून हटवण्यात येईल.), दि. 21 मे रोजी सकाळी 11 ते दि.28 मे 2025 सायं. 6 वाजेपर्यंत हे प्रत्यक्ष नोंदणी व पसंतीक्रम नोंदविण्यात येईल. 1 ते 10 पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती कोटा (व्यवस्थापन, इन-हाऊस, अल्पसंख्याक) साठी अर्ज प्रत्येक फेरीपूर्वी कन्सेंट आवश्यक राहील. दि. 30 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल.दि. 30 मे ते 1 जुन 2025 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत हरकती व दुरुस्ती प्रक्रिया (Login द्वारे) स्विकारल्या जाईल. दि 3 जुन रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. दि 5 जुन रोजी गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप (शून्य फेरी) होईल. दि. 6 जुन 2025 रोजी सकाळी 10 वाजता वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर उपलब्ध होईल. दि. 6 जुन ते 12 जुन 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत “Proceed for Admission” निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे व आवश्यक कागदपत्रे अपलोड व प्रत्यक्ष तपासणी पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य राहील. दि. 14 मे रोजी रात्री 10 वाजता दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर होईल.

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांना शिवतीर्थावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन*

vishwatmaklokswamivarta

राजर्षि छत्रपती शाहु महाराज जयंतीनिमित्त गुरूवारी समता दिंडी, चित्ररथ…

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला सुरूवात

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप  विमा भरण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ..

कर्जतजवळील ‘सुकून एम्पायर – हलाल टाउनशिप’ या धर्माधारित गृहप्रकल्पांवर बंदी घाला !* – हिंदु जनजागृती समितीची मागणी*कर्जत येथे ‘हलाल टाउनशिप’ विरोधात आंदोलन*

vishwatmaklokswamivarta

राज्यामध्ये प्रती आणि समृद्धी सरकार –उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी आपला अन्नदाता, आपला मायबाप ; बियाणे अतिशय उत्कृष्ट प्रतीची हवीत