vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शंखनाद महोत्सव : ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ उद्बोधन सत्र !**राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते!* – मेजर गौरव आर्य, चाणक्य फोरम्

*शंखनाद महोत्सव : ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ उद्बोधन सत्र !**राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते!* – मेजर गौरव आर्य, चाणक्य फोरम्

 

राज्य प्रतिनिधी   *फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी)* – राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते. साधूसंतांच्या रक्षणासाठी श्रीरामाचा जन्म झाला. मुघलांचे आक्रमण वाढल्यानंतर हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, गुरुगोविंदसिंग यांचा जन्म झाला. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात हिंदूंच्या रक्षणासाठी प्रभु श्रीराम पुन्हा अवतीर्ण झाल्याचा साक्षात्कार होत आहे, असे वक्तव्य ‘चाणक्य फोरम’चे मुख्य संपादक तथा सेवानिवृत्त मेजर गौरव आर्य यांनी केले.

     ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘सनातन राष्ट्र आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य’ या सत्रात ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ या विषयावर गौरव आर्य यांनी विचार मांडले.

 या वेळी व्यासपिठावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष श्री. सतीश प्रधान, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे समन्वयक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.

*हिंदू बलशाली होण्याकडे दुर्लक्ष केल्यानेच देशाचे अवमूल्यन !* – रणजित सावरकर ‘हिंदूंचे राजनितीकीकरण आणि राजनीतीचे सैनिकीकरण होणे आवश्यक आहे. हिंदू बलशाली व्हायला हवेत. स्वातंत्र्यानंतर देशात सत्तेवर आलेल्या सरकारने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे देशाचे अवमूल्यन झाले. त्या काळात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी हिंदूंच्या संघटनाला प्रारंभ केला. सनातनच्या गोवा येथील आश्रमात आल्यावर मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक कार्याची प्रचिती आली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले असे एकमात्र व्यक्ती आहेत, जे राष्ट्राला दिशा देण्यासाठी कार्य करत आहेत. हिंदूंना बळशाली करण्यासाठी कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत आहेत, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी या वेळी म्हटले. या वेळी श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘हिंदूंना धर्मशिक्षण प्राप्त व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणवर्ग चालू केले. सद्यस्थितीत देशात समितीच्या वतीने ५०० ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू आहेत. समितीने समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे.’’ सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव म्हणाले, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन करून जगभर अध्यात्मप्रसार केला आहे. तसेच नृत्य, गायन, संगीत याद्वारे अध्यात्मिक प्रगती कशी करायची याचे मार्गदर्शन त्यांनी केले.’’ पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष श्री. सतीश प्रधान म्हणाले की, महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला, त्याप्रमाणे हिंदूंच्या आस्थेचा विचार करून सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने गोवा सरकारनेही गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यावा. *श्री. अभय वर्तक,* प्रवक्ते, सनातन संस्था.

000000

संबंधित पोस्ट

मुंबई – पुणे एक्सप्रेसवे वरील वाहतूक सुरळीत सुरू महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची माहिती

मणिपूरमध्ये परिस्थिती गंभीर, इंटरनेट सेवांनंतर सर्व ट्रेनही रद्द..

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी 13 मे रोजी भरपगारी सुट्टी देण्याची सूचना 

समीर गायकवाड’सारखे आणखी किती बळी आपण जाऊ देणार ?समीर गायकवाड यांच्या श्रद्धांजली सभेत हिंदुत्वनिष्ठांचा संतप्त प्रश्न..

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर शासनाचा भर–पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

हरियाणा येथील गुरुग्राममध्ये कांजवालासारखी घटना, चालकाने गाडीखाली अडकलेली बाईक 4 किलोमीटरपर्यंत

vishwatmaklokswamivarta