vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रतिज्ञा 

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रतिज्ञा

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार यांच्यासमवेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, लेखा अधिकारी श्री.विजय रांजणे, सहा.आयुक्त श्रीम. अलका महापूरकर, श्रीम.स्वरूपा परळीकर, श्री.अरूण पाटील, इस्टेट मॅनेजर श्री.अशोक अहिरे, प्रशासकीय अधिकारी श्री.संजीव पवार आणि उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी सामुहिक प्रतिज्ञा ग्रहण केली. यावेळी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.“आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याव्दारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करीत आहोत” अशी प्रतिज्ञा घेत महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाने “आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करू, तसेच मानवी जीवित आणि मूल्य धोक्यात आणणा-या विघटनकारी शक्तीचा प्रतिकार करू” असा प्रतिज्ञेचा मजकूर सामुहिकरित्या म्हटला.

000000

संबंधित पोस्ट

चाकण पाणीपुरवठा प्रकल्पात एकाच कामासाठी दोन योजना;विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी होणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एशिया कप सिंगापूर स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाला रौप्य पदक.! बुलढाण्याच्या मिहिर अपार याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक

vishwatmaklokswamivarta

भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यचळवळीतील व राष्ट्र उभारणीतील योगदान महत्त्वाचे- *ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे* 

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासावर 130 मतदार नोंदणीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयी जिल्हा प्रशासनाने केले वस्तुस्थितीदर्शक स्पष्टीकरण*

vishwatmaklokswamivarta

श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास_*श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाकडून आयोजन*श्रीकृष्ण जन्मभूमी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी वैश्विक श्रीनारायण महायज्ञाचे वरळी, मुंबई येथे आयोजन* 

vishwatmaklokswamivarta

देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात सोलर समूहाचे मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोबोटिक्स ॲण्ड युएव्ही फॅसिलिटी प्रकल्पाचे भूमिपूजन