vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

१०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा

१०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा

गडचिरोली प्रतिनिधी: राज्यभरात राबवण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत गडचिरोली कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी आणि त्यांच्या टीमचे जिल्हा प्रशासनातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात राज्याच्या सर्व महसूली विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. यात सामाजिक न्याय विभागाच्या सर्व जिल्हास्तरीय कार्यालयांमधून गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभागाने तिसरा क्रमांक मिळवला आहे.
या मोहिमेअंतर्गत गडचिरोली कार्यालयात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘आपला दोस्तालू / आपला स्नेहीतुडू’ या नावाने ९४२३११६१६८ हा व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू करण्यात आला आहे, ज्यामुळे दुर्गम भागातील लोकांना समाज कल्याणच्या सर्व योजनांची माहिती घरबसल्या मिळत आहे आणि त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची आवश्यकता राहिली नाही. तसेच, १५० विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत वातानुकूलित अभ्यासिका तयार करण्यात आली आहे आणि २०० क्षमतेचा सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण हॉल देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कार्यालयातील रेकॉर्ड व्यवस्थापनातही मोठी सुधारणा झाली आहे; संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड रूम बनविण्यात आली असून, त्यात कागदपत्रांचे अ, ब, क, ड, इ असे वर्गीकरण करण्यात आले आहे. ‘झिरो एनर्जी’ संकल्पनेअंतर्गत संपूर्ण कार्यालयात ऑन ग्रिड सोलर सिस्टीम बसविण्यात आल्याने विजेच्या बिलात मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. याव्यतिरिक्त, संपूर्ण इमारतीत स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतागृहांची नियमित सफाई यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
या सर्व सुधारणांबरोबरच, एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून येथील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना विमानाने इस्रो (ISRO) येथे नेण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली. या सर्व प्रयत्नांमुळे कार्यालयाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली असून, नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक सोयीस्कर झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने डॉ. सचिन मडावी यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक न्याय विभागाच्या या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.

संबंधित पोस्ट

सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला तहसिलनिहाय तर 25 एप्रिल रोजी महिला आरक्षण सोडत

मुलुंड मेट्रो दुर्घटना: कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कारवाई

vishwatmaklokswamivarta

पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; नागरिकांनी संयम पाळून अफवांपासून दूर राहावे : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-मुदतवाढीची ती बातमी खोटी

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धाअधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासनात गतिमानता व लोकाभिमुखताआणण्यासाठी अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

आज तब्बल ५ हजार ३५४ घरे व ७७ भूखंडाच्या संगणकीय सोडतीद्वारे घराचे स्वप्न झाले साकार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत–२०२५ संपन्न

vishwatmaklokswamivarta