vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करेल वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची ग्वाही

वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करेल वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची ग्वाही

मुंबई, प्रतिनिधी- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, जालना शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात येत आहे .या स्मारकामुळे जालना शहर पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणूनही ओळखले जाईल, या स्मारकासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.

जालन शहरातील अंबड चौफुली परिसरात उभारण्यात येत असलेल्या ‘हिंदूधर्मरक्षिका महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पाहणी केली. या प्रसंगी आमदार नारायण कुचे, भास्कर आबा दानवे, बद्रीनाथ पठाडे, भगवान मात्रे, स्मारक समितीचे अध्यक्ष कपील दहेकर, सचिव शांतीलाल बनसोडे, कोषाध्यक्ष बालासाहेब अबुज, सदस्य तुकाराम कोल्हे, एस. एस. दहेकर, प्रा. गणेश गुंजाळ, साहित्यिक पंडित तळेगावकर, कुरधने सर, काळे साहेब यांच्यासह विविध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री संजय सावकारे म्हणाले, जालना शहराचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा समृद्ध करणारे २४ फूट उंचीचे हे स्मारक देशातील सर्वात उंच अहिल्यादेवी होळकर स्मारक ठरणार असून वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे आहे या स्मारकाच्या पार्श्वभूमीला ऐतिहासिक महेश्वर किल्ला आणि इंदूर राजवाड्याच्या संकल्पनेचा मिलाफ साधणारी २८ फूट उंच आणि ५६ फूट रुंद दगडी भिंत उभारली जाणार आहे. ही भिंत स्मारकाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. या भव्य प्रकल्पासाठी आणि सुशोभीकरणासाठी शासन सकारात्मक असून सर्वतोपरी सहकार्य करेल.

स्मारक समितीचे अध्यक्ष कपील दहेकर म्हणाले,हे स्मारक अहिल्यादेवींच्या कार्याचा आणि त्यांच्या समाजसुधारणेच्या विचारांचा गौरव आहे. यामुळे जालना शहराचे सांस्कृतिक वैभव वाढेल आणि भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल.

दरम्यान जालना जिल्ह्यात तिरंगा यात्रा समारोप आणि माजी सैनिकांचा सत्कार कार्यक्रमवस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत पार पडला.

 

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नव उदयोजक मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यात कुठल्याही आस्थापनेत #माथाडीकामगार ची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे,-कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

बंदीजना करीता मध्यवर्ती कारागृहत  ‘जीवन जगण्याची कला’ शिबिर संपन्न

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटकांना पर्यटन सुविधांची माहिती देण्याचे आवाहन**महाबळेश्वर येथे आयोजित महापर्यटन उत्सव-२०२५ चा शानदार समारोप*

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली ‘कुंभमेळा’ विकास कामांची पाहणी सिंहस्थ कुंभमेळा २०२७

भगवानगड विकासासाठी वनविभागाची ४ हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार