vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

खरीप 2025 हंगामासाठी अन्नधान्य व वाणिज्यिक पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत पिकांच्या अनुदानावरील प्रमाणित बियाण्यांकरिता अर्ज करावेत

खरीप 2025 हंगामासाठी अन्नधान्य व वाणिज्यिक पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत पिकांच्या अनुदानावरील प्रमाणित बियाण्यांकरिता अर्ज करावेत

ठाणे, प्रतिनिधी):- राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान- अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्व विचारात घेता सुधारित / संकरीत वाणांच्या प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या घटकांतर्गत प्रति शेतकरी आर्थिक सहाय्य किमान 0.20 हेक्टर ते कमाल 1 हेक्टरपर्यंत मर्यादित आहे.

प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येणार असून सोयाबीन, भुईमुग, सुर्यफूल व तीळ या पिकांकरिता 100% अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याकरिता https://mahadbt.maharashtra.gov.in/FarmerAgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर “बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते” या टाईटल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. या घटकाची प्रथम लाभार्थी निवड यादी दि.30 मे 2025 रोजी जाहीर करण्यात येईल.  तसेच भात, तुर, मुग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, वरई या पिकांकरिता अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी 7/12 उताऱ्यासह कोणतेही एक ओळखपत्र बियाणे वितरकाला दाखवून अनुदान वजा जाता लोकवाटा भरुन प्रमाणित बियाणाचा लाभ घ्यावा. प्रमाणित बियाणे घटकास अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर करण्यात येणार आहे.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’- विभागीय आयुक्त नयना गुंडे• विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘iGOT कर्मयोगी’ पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन

जिल्ह्यात ११ तूर खरेदी केंद्र कार्यान्वित

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद लक्षवेधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात कोणावरही अन्याय होणार नाही- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

बुलढाणा तालुक्यातील अवसायनातील 103 संस्थांची नोंदणी रद्द होणार; आक्षेप नोंदविण्याचे सहायक निबंधकाचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक कुटुंबाची माहिती मोबाईल ॲपवर नोंदवून जनगणना केली जाईल     -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,संत नामदेव महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार व संत जनाबाई महाराज यांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा