vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिव राज्यभिषेक दिवसाचे आयोजन

मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिव राज्यभिषेक दिवसाचे आयोजन

बुलडाणा, प्रतिनिधी- सेवागिरी बाबा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोताळा येथे शुक्रवार दि. 6 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता शिवराज्यभिषेक दिवस साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमात संस्थेतील माजी प्रशिक्षणार्थी मेळावा व स्थानिक उदयोजक सहभागी होणार आहेत.

विभागाचे मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांचे संकल्पनेतुन सदर कार्यक्रम साजरी करण्यात येत असुन नागरिकत्व आणि शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचारांचा प्रसार, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संरक्षण या विविध विषयावर मान्यवर वक्ते यावेळी प्रबोधन करणार आहेत. सदर कार्यक्रमात मोताळा व परीसरातील सर्व नागरीक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस.डी. गंगावणे यांनी केलेले आहे.

000000

संबंधित पोस्ट

लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी उद्या ११ जुलै रोजी आरक्षण सोडत

करंजा मत्स्य बंदर प्रकल्प कामांसाठी अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर करावा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• ४,५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता• दुसऱ्या टप्प्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीस मिळणार गती..

पायभूत सुविधा निर्मितीतून लातूर पोलीस दल आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• लातूर सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण• नवनियुक्त ४६ पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप• क्यूआर कोड आधारित पेट्रोलिंग यंत्रणेचा शुभारंभ

अक्षयतृतीयेला सांगली जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या  – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील- बालविवाह ठरला किंवा होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलीस   विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- नियम मोडल्यास होणार कडक कारवाई वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालयचालक, जाणीव पूर्वक व जबरदस्तीने बाल विवाह   केल्यास होणार गुन्हे दाखल 

विनापरवाना ड्रोन उडवणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल – नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन 

राष्ट्र्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न…

vishwatmaklokswamivarta