vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी;जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी;जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी) : शेतीतून अधिकाधिक उत्पादनासाठी निविष्ठांची (बियाणे, खते व किटकनाशके) गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी निकृष्ट, भेसळयुक्त अथवा अनधिकृत उत्पादनांपासून बचाव करण्यासाठी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

बियाणे, खते व किटकनाशके फक्त अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. दर्जा व गुणवत्ता हमीसाठी सरकारने मान्यता दिलेल्या विक्रेत्यांकडूनच निविष्ठा खरेदी कराव्यात, खरेदीची पावती घेणे आवश्यक असून विना पावती खरेदी केल्यास तक्रार करण्याचा हक्क नाकारला जाऊ शकतो म्हणून बियाण्याचे पाकिट सिलबंद, लेबलयुक्त व मोहरबंद असावे. पिशवी, टँग आणि पावती पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी, बियाणे व किटकनाशके खरेदी करताना त्यांच्या वापरण्याच्या अंतीम मुदतीची खात्री करावी, किंमत व वजनात फसवणूक टाळा, छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री अथवा कमी वजन दिल्यास त्वरित कृषि विभागाशी संपर्क साधावा. शंका आल्यास त्वरित तक्रार नोंदवा. कोणतीही तक्रार असल्यास तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. एच.टी.बी.टी./बीटी-3 चोर बियाण्यांपासून दूर राहा, अनधिकृत बीटी बियाणे खरेदी करू नये. शिफारस केलेल्या तणनाशकांचा वापर मान्यता प्राप्त बियाण्यांसाठीच शिफारस केली असल्यास तणनाशकांचा वापर करावा. भेसळ, बनावट उत्पादने असल्यास तसेच याबाबत अनधिकृत विक्रीबाबत माहिती मिळाल्यास शेतकऱ्यांनी कृषि विभागास तात्काळ कळवावे.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केल्यास उत्पादनात वाढ होऊन आर्थिक नुकसान टाळता येईल. शेतीच्या सुरक्षिततेसाठी आणि शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

महापौर सुजाता पाटील यांनी विशेष बैठकीत घेतला पावसाळी स्थितीचा सविस्तर आढावा 

काशिमिरा पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई: २२.३३ कोटींचे कोकेन जप्त, दोन परदेशी नागरिकांसह एका भारतीय महिलेला अटक. पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश..

जागतिक पर्यावरण दिन विशेष पोफळेकरांचे ‘सुर्याय नमः’‘पोफळा’ ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम..

जागतिक वन दिन; सायकल रॅली,चित्रप्रदर्शनाद्वारे जनजागृती

ऑटो रिक्षा व टॅक्सी नवीन परवान्यांच्या इरादापत्रांचे वितरण स्थगित

पदवीधर मतदार संघ मतदार यादीमध्ये18 डिसेंबरपर्यंत नाव नोंदविता येणार· दावे व हरकती दाखल करण्यासाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta