vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत”जमीन विक्रीसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

“भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत”जमीन विक्रीसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

लातूर( प्रतिनिधी दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन आदिवासी कुटुंबांना शेत जमीन मिळण्यासाठी “भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजना” राबविण्यात येते. या योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील (प्राधान्याने किनवट व माहूर तालुका) येथील शेती मालकांनी आदिवासी विभागाच्या 28 जुलै, 2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जमीन विकण्यासाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, ता.किनवट, जि. नांदेड येथील सुविधा केंद्रामध्ये 10 जुलै, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत परिपूर्ण अर्जाचा भरणा करावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02469-222015 किंवा poitdp.kinwat-mh@gov.in या ई-मेल आयडीवर संपर्क करण्याचे आवाहन नांदेड येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जेनित चद्रा दोन्तुला यांनी केले आहे.

भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत 04 एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा 02 एकर बागायती (ओलीताखालील) जमीन शासनामार्फत शेती मालकांकडून खरेदी करून पात्र भूमिहीन आदिवासी कुटुंबाला उपलब्ध करून दिली जाते, असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

संबंधित पोस्ट

आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य – मंत्री डॉ. अशोक वुईके विविध मागण्यांवर शासनाची सकारात्मक कार्यवाही

राखीचे पाकीटे स्वीकारण्‍यासाठी पोस्ट ऑफीसमध्ये स्वतंत्र यंत्रणा*

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात 16 मेपासून घरयादी व घरगणना होणार- निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे- 14 जूनपर्यंत चालणार कार्यवाही – प्रगणकांना परिपूर्ण माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

जिल्हाभरात शाळाप्रवेशाचा उत्सव पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी उच्चपदस्थांनी केले शाळेतल्या पहिल्या पावलाचे स्वागत…

जालना व छत्रपती संभाजीनगरमधील #प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा

vishwatmaklokswamivarta

उत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंडखैरी येथे गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचे उद्घाटन