vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माफसूच्या विकसित कृषी संकल्प अभियानास राज्यभर उत्कृष्ट प्रतिसाद…

 माफसूच्या विकसित कृषी संकल्प अभियानास राज्यभर उत्कृष्ट प्रतिसाद…

ठाणे, प्रतिनिधी) :- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) अंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्र, ठाणे व मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांच्या तर्फे विकसित कृषी संकल्प अभियान दि.29 जून ते 12 जून 2025 पर्यंत ठाणे जिल्ह्यात सहा तालुक्यात राबविण्यात येत आहे. मागील चार दिवसांमध्ये 30 गावातील शेतकऱ्यांशी शास्त्रज्ञांनी संवाद साधला.

विद्यापीठातील संशोधन शेतकऱ्यांच्या दारी या नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित या महत्त्वकांक्षी अभियानात टीम मधील विषय तज्ञ हे शेतकरी, पशुपालक व महिला बचत गटांची थेट संवाद साधण्यावर भर देत आहेत. तसेच यशस्वी दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन व्यवसाय बाबत शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना विकसित कृषीला वास्तवात बदल करण्यात प्रेरित करत आहे. सध्याच्या आव्हानांचा विचार करता शेतीमध्ये विविध वाढणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रसार, नैसर्गिक शेती, कृषी, मत्स्य पालन, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व्यवसाय, कुक्कुट व्यवसाय, लसीकरण, खाद्याचे व्यवस्थापन, आरोग्य व प्रजनन व्यवस्थापन, म्हशींच्या पावसाळी हंगामातील व्यवस्थापन देखभालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आत्मा, कृषी विभागातील अधिकारी व आयसीएआर यांचे शास्त्रज्ञ यांनी शेतकऱ्यांना पूर्व खरीप नियोजनाबाबत, खरीप हंगामातील नियोजन, कृषी योजनांच्या माहितीबद्दल, पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान, कृषीच्या विविध योजना, बीज प्रक्रिया व आधुनिक तंत्रज्ञान तसेच बिजांची उगवण क्षमता याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. वेळेवर पेरणी आणि कीड नियंत्रणावर जर भर देण्यात आला तर उत्पादनात आणि उत्पादकतेत वाढ होईल, रासायनिक खतांचा अतिरेक मातीच्या आरोग्यास घातक ठरत असून सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे आजच्या काळाची गरज या बाबत शेतकऱ्यांना अवगत करण्यात आले.

विद्यापीठातील तज्ञांनी निसर्गाच्या अनिश्चिततेवर आधारित शेतीच्या जोडीला वैज्ञानिक पद्धतीने पशुपालन केल्यास शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकते याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केला व सेंद्रिय शेतीसाठी पशुधनाचे महत्त्व सुद्धा अधोरेखित केले.हे अभियान चालू झाल्यापासून मागील पाच दिवसांमध्ये कल्याण तालुक्यातील पोई, दाहगाव, बापसाई, पलसोली, उशीद व कोसले तसेच भिवंडी तालुक्यातील खाणीवली, मोहांडुल, कसाने, कावड, झिडके, घोटगाव तसेच शहापूर तालुक्यातील ताकीपाथर, ढोलखांब, मांजारे, चांग्याचापाडा, शेणवा, खारणगाव तसेच मुरबाड तालुक्यातील मुरबाड, देहेनोली, टेंभारे, कोराले, शिवाले, खंडारे, परताले, माजगाव, देहारी, खुटाळ, नांदगाव, माणिवली अश्या 30 गावांना या अभियाना अंतर्गत तज्ञांनी भेटी दिल्या. प्रत्येक गावातील भेटी दरम्यान शेतकऱ्यांची नोंद गुगल फॉर्मवर व ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन रजिस्टर मध्ये घेण्यात येत आहे.: अभियानासाठी डॉ. हांडे, डॉ. गुडेवार, डॉ. मेश्राम, डॉ. चव्हाण, डॉ. कदम, डॉ. गोळे, डॉ. शाहीर गायकवाड तसेच आत्मा या संस्थेतील सौ. वैशाली भापसे, रुपेश जाधव, सुनील पवार, जितेश खडगे, विनोद कदम महाराष्ट्र राज्य कृषी विभागातील अधिकारी कुमार जाधव, श्री. कांबळे, श्री. राऊत, डॉ. डी.सी शिंदे, श्री.ताटे, श्री राऊत, कुमार जाधव तसेच आयसीएआर चे वैज्ञानिक डॉ. कनिका शर्मा, डॉ. शर्मिला पाटील यांनी गावातील शेतकऱ्यांना, पशुपालकांना भेटून विविध विषयावर मार्गदर्शन व चर्चा केली.तसेच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू ) संपूर्ण महाराष्ट्रात या अभियानांतर्गत

वेगवेगळ्या जिल्ह्यात सहभागी झालेले आहे. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातर्फे संपूर्ण कोकण विभाग तसेच नंदुरबार, नाशिक आणि धुळे जिल्ह्यासाठी एक जिल्हा एक अधिकारी या अंतर्गत प्रतिनिधी ची नेमणूक केलेली आहे जेणेकरून विद्यापीठांतर्गत झालेल्या संशोधनाचा शेतकऱ्यांच्या बांधावर, पशुपालकांच्या गोठ्यापर्यंत प्रसार होईल.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन विद्यापीठाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार व मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश इंगोले मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.

 00000

संबंधित पोस्ट

समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांच्या पत्नीचं निधन..

धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने प्रकल्पग्रस्तांना पूनर्वसन पॅकेज २३ लाभार्थ्यांना २ कोटी ७३ लाखांचे धनादेश वाटप

घोटाळेबाजांची एसआयटीमार्फत चौकशी करावी-विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शुक्रवारी धरणे / निदर्शने आंदोलन

वृक्षारोपण व संवर्धन सामाजिक जबाबदारी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळावा.

vishwatmaklokswamivarta