vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिद्धीकरिता*‘प्लास्टिकक्त नवी मुंबई’साठी प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिकेचा विशेष उपक्रम*

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिद्धीकरिता*‘प्लास्टिकक्त नवी मुंबई’साठी प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिकेचा विशेष उपक्रम*

       नवी मुंबई प्रतिनिधी – ‘प्लास्टिकमुक्त नवी मुंबई’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वत:पासूनच सुरुवात करीत महापालिका मुख्यालयासह आपली कार्यालये एकल वापर प्लास्टिकमुक्त करण्यावर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भर दिला आहे. या अनुषंगाने नागरिकांमध्येही प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबविण्याबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत असून प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधातील मोहीमा प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

 प्रतिबंधात्मक प्लास्टिक मोहीमेला गती मिळावी या दृष्टीने प्रोजेक्ट मुंबई या स्वयंसेवी संस्थेशी नवी मुंबई महानगरपालिकेचा सामंजस्य करार (MOU) झालेला असून ‘नवी मुंबई प्लास्टिक आणि ई-वेस्ट रिसायक्लोथॉन’ चा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. याव्दारे नवी मुंबईतील घराघरातून एकल वापर प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी ठोस काम केले जाणार आहे.

   या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना वैश्विक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मुलन ही असून या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका आणि प्रोजेक्ट मुंबई ही संस्था प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी पुढाकार घेउुन काम करणार आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये याविषयी जागरुकतेची वाढ, प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर थांबविण्याकरीता स्वत:चा सहभाग तसेच सामाजिक पातळीवर प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी कृतिशीलता याप्रकारे काम केले जाणार आहे.

  या अंतर्गत गृहनिर्माण संस्था, वसाहती, कॉर्पोरेट गट, शैक्षणिक संस्था अशा विविध ठिकाणी वेगवेगळया माध्यमांचा वापर करुन प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या वतीने मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात येईल. त्याचप्रमाणे नोंदणीकृत संस्था व सोसायट्यांकडून प्लास्टिक आणि ई-कचरा संकलीत केला जाईल. पहिल्या टप्प्यात साधारणत: 250 हून अधिक सोसायट्यांची नोंदणी करण्यात येईल व माध्यमातून अंदाजे 2 लाख नागरिकांना या उपक्रमात पहिल्या टप्प्यात सहभागी करुन घेण्यात येईल.

  यामध्ये उद्याने तसेच इतर सार्वजनिक ठिकाणे आणि संस्था या ठिकाणी ठेवण्यासाठी पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकमधून बेंचेस, भांडी, चालण्याचे ट्रॅक, पेन्सिल बॉक्स व इतर उपयोगी वस्तू बनविल्या जातील व थ्री-आर सुत्रांनुसार प्लास्टिकचा पूनर्वापर केला जाईल. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक नोडमध्ये ग्रीन चॅम्पियन तयार होतील.   प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिशीर जोशी आणि त्यांच्या सहका-यांनी मालाड येथील चिल्ड्रन्स अकादमीतील शालेय मुलांकडून प्लास्टिकचा पुनर्वापरातून भव्यतम आकर्षक कलाकृती निर्माण केली असून ती नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय परिसरात प्रदर्शित करण्यात येणार आहे व नंतर महापालिका क्षेत्रातील लक्षवेधी उद्यानात स्थापित करण्यात येईल.

     *नवी मुंबईकर नागरिकांना प्लास्टिक कचरा कमी करण्याची आणि त्याचा पूनर्वापर करण्याची सवय लागावी व यामधून नवी मुंबई शहर हे स्वच्छ व सुशोभित शहराप्रमाणेच प्लास्टिकमुक्त शहर म्हणून ओळखले जावे ही नवी मुंबई महानगरपालिकेची भूमिका आहे असे स्पष्ट करीत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबई शहरातील प्रत्येक नागरिक हा पर्यावरणविषयक जागरुक असावा यादृष्टीने मुंबई शहरात उत्तम काम करणा-या प्रोजेक्ट मुंबई या संस्थेसोबत प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. झिरो वेस्ट गार्डन साकारण्यासाठी जागरुक नवी मुंबईकर नागरिक पर्यावरणशीलता जपत सक्रीय योगदान देतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.*

संबंधित पोस्ट

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत विजेत्या गणेशोत्सव मंडळाची नावे जाहीर विटा येथील तिरंगा गणेशोत्सव मंडळ राज्यात प्रथम

vishwatmaklokswamivarta

शाहरूखच्या मन्नतला आर्यनची प्रतिक्षा:आज तुरुंगातून बाहेर येऊ शकतो आर्यन; वकील मुकुल रोहतगी 

vishwatmaklokswamivarta

मुंबई लोकल मध्ये पुरूषांनी खचाखच भरलेल्या डब्ब्यात तिकीट तपासण्याची हिंमत दाखवणार्‍या महिला कर्मचारीचा व्हिडिओ वायरल…

vishwatmaklokswamivarta

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता, मात्र सिनेमाची जादू प्रेक्षकांच्या मनात कायम अजरामर राहील!

vishwatmaklokswamivarta

राज्यातील बड्या शहरांमध्ये शहरी नक्षलवाद वेगाने पसरत आहे. सरकारने शहरी नक्षलवाद्यांवर त्वरीत कारवाई करावी, राष्ट्रवादीचे शरद पवार .

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक *२७ वर्षे खटला प्रलंबित राहिल्याने न्यायालयात आत्महत्या: ५ कोटी खटले, ३२४ वर्षांची प्रतीक्षा**‘तारीख पे तारीख’ कधीपर्यंत; नामदेव जाधवांना न्याय कधी मिळणार ? – श्री. अभय वर्तक, सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta