vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाडीबीटी पोर्टलवरून प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महाडीबीटी पोर्टलवरून प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी : अन्न व पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन 2025-26 अंतर्गत खरीप हंगामासाठी जिल्ह्याला लक्षांक प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत तूर, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन आणि तीळ या पिकांसाठी पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरण या घटकांसाठी शेतकरी गट, उत्पादक कंपनी, सहकारी संस्था व वैयक्तिक शेतकरी यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पिक प्रात्याक्षिकामध्ये सहभागी होण्याकरिता 31 मार्च 2024 पूर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज करू शकतात. गटातील प्रत्येक शेतकऱ्यांचे शेतकरी ओळखपत्र आवश्यक असून एका कुटुंबात एका शेतकरी लाभार्थ्याकरिता 0.40 हेक्टरचा लाभ घेता येईल. 10 हेक्टर चा एक गट याप्रमाणे 25 शेतकरी असणे आवश्यक आहे. ज्या गटात 25 पेक्षा जास्त शेतकरी असतील तर त्यातील 25 शेतकऱ्यांची निवड करावी. किंवा जर गटात 25 पेक्षा कमी शेतकरी असल्यास गटाबाहेरील पात्र शेतकऱ्याची निवड करता येईल.प्रात्याक्षिका करिता निवड झालेल्या शेतकरी गटांना कृषि विभागामार्फत पुरविण्यात आलेल्या निविष्ठा व तंत्रज्ञानाचा वापर करणे तसेच प्रात्याक्षिक प्लॉटला तुलनात्मक प्लॉट असणे बंधनकारक आहे. तसेच निवड झालेल्या गटातील सर्व शेतकऱ्यांना मृद तपासणी करणे बंधनकारक राहील.     प्रमाणित बियाणे या घटकाकरिता ॲग्रिस्टक शेतकरी ओळखपत्र असलेले शेतकरी महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज करू शकतात. किमान 0.20 हेक्टर ते 1 हेक्टर क्षेत्राकरिता लागणारे मुंग,उडीद,तूर, सोयाबीन,तीळ आणि कापूस पिकाचे प्रमाणित बियाणे करिता शेतकरी धारण क्षेत्रानुसार अर्ज करू शकतात. लक्षांकाच्या मर्यादेत प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्याने लाभ देण्यात येईल. प्रमाणित बियाणे वितरण करिता पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना मृद तपासणी करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यास पिक प्रात्यक्षिक किंवा प्रमाणित बियाणे वितरण लाभर्थीची निवड करुन महा.डी.बी.टी. पोर्टलवर पुढील दोन दिवसामध्ये लाभ घेता येईल. त्यानुसार 5 जून 2025 रोजी प्रथम येणाऱ्यास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वानुसार पहिली यादी प्रसिद्ध करण्यात येईल. जिल्ह्यातील शेतकरी गट, उत्पादक कंपनी, सहकारी संस्था व वैयक्तिक शेतकरी यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या लिंकव्दारे महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिक्षक मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी अचानक पुराचा लोंढा वस्तीत घुसल्यानं घरं दुकानं तसंच वाहनांचंही नुकसान झालं. 

मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने ज्ञान आकलन क्षमता वाढते- जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड

vishwatmaklokswamivarta

सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थींनी अर्ज करावेत- तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ-मिरज तालुक्यातील 1105 नव्या लाभार्थींना योजनेचा लाभ…

आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

vishwatmaklokswamivarta

वसुंधरा दिनानिमित्त ‘वसुंधरा रक्षक अभियान’, महा आरपीईटी अभियानाचा शुभारंभ-पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकांने ‘वसुंधरा रक्षका’ची भूमिका बजावावी- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

निराधारांना अनुदानाचे तीन हजार रुपये मिळणार !* विशेष सहाय्य योजना अनुदान वितरणाला सुरुवात* आधार प्रमाणीकरण असेल तरच अनुदानाचा आधार !* १,१६,६१४ लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबर, जानेवारीचे अनुदान जमा…* आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारी व मार्च चे अनुदान ६ मार्च रोजी जमा..