vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रायगड कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी 05 बालविवाह थांबविण्यास यशस्वी…

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रायगड कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी 05 बालविवाह थांबविण्यास यशस्वी…

          रायगड ( प्रतिनिधी: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रायगड कार्यालयातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीम.सूहिता ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, रायगड व चाइल्ड हेल्प लाईन यांच्या माध्यमातून तालुक्यातील पनवेल- 01 , पेण -02, माणगाव -02 असे एकूण 05 बाल विवाह बाबत कार्यवाही करण्यात आली.

 प्रत्यक्ष गावात भेट दिली असता अल्पवयीन बालक व बालिका यांचा बाल विवाह होत असल्याचे समजले दोन्ही बालकांचे आई- वडील व नातेवाईकांना यांना समज देण्यात आली व मार्गदर्शन केले. हे बाल विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या माध्यमातून मिळाली पनवेल येथील रहिवासी असलेली मुलीचे वय 16 वर्ष असे होते. पेण तालुक्यातील मुलीचा विवाह निश्चित असलेला मुलीचे वय 17 वर्ष आहे इतके आहे व दुसऱ्या मुलीचे वय 17 वर्ष होते. हे बळवली आदिवासी वाडी पेण येथील रहिवासी आहेत. भादाव आदिवासी वाडी माणगाव तालुक्यातील मुलीचा विवाह निश्चित असलेला मुलीचे वय 16 वर्ष आहे. एंकदरीत पाचही वधू अल्पवयीन आहे. यावरून बाल विवाह होत आहे असे निदर्शनास आले बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अल्पवयीन बालकांचे बाल विवाह होणार नाही या बाबत सूचना देण्यात आल्या.

  तसेच पालकांकडून जबाब नामा लिहून घेऊन पालकाला समज देण्यात आली तसेच अल्पवयीन बालकांना बाल कल्याण समिती समोर उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या. गाव बाल संरक्षण समिती सदस्य यांना व आई वडील यांना मार्गदर्शन केले व समज देण्यात आली. यावेळी माणगाव पोलिस स्टेशन, पेण पोलिस स्टेशन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष रायगड चाईल्ड हेल्प लाईन इ उपस्थितीत होते. या ठिकाणी उपस्थितीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रायगड कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी बाल विवाह थांबविण्यास यशस्वी झाले.आठ समित्यांच्या कामकाजाबाबत त्रैमासिक आढावा बैठक संपन्न

  जिल्हाधिकारी किशन जावळे रायगड यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या एकूण आठ समित्यांचा कामकाजाबाबत त्रैमासिक आढावा बैठक संपन्न झाली. या आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड श्रीम.नेहा भोसले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रायगड श्रीम.सुहिता ओव्हाळ, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनिषा पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक-माध्यमिक, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, विशेष पोलिस पथक, अधिक्षक विशेष दत्तक संस्था, परिविक्षा अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष रायगड, वन स्टॉप सेंटर मधील अधिकारी कर्मचारी, चाइल्ड हेल्पलाइन रायगड इत्यादी उपस्थित होते.  बैठकीमध्ये बालविवाह, POCSO केसेस, बालकामगार, दत्तक विधान, SAA-CCI लिंक बालके, बालगृहातील स्वच्छता, कोविडच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, मान्सून पूर्वतयारी त्याचप्रमाणे बालकांच्या इतर विषयाबाबत आढावा घेण्यात आला.

  तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय रायगड व त्रिकाय केयर अंड क्रिएशन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेले बाल विवाह प्रतिबंधक पोस्टर चे अनावरण जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.   सदर बैठकीची प्रस्तावना जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी केली तसेच आठ बैठकींचे सादरीकरण परीवीक्षा अधिकारी यांनी केले.

000000

संबंधित पोस्ट

इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळेमहाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात पुढाकार घेण्याचे केले आवाहन

शिराळा, जत, विटा येथे सैनिक मेळावा

vishwatmaklokswamivarta

ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये महाराष्ट्राला पदक मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्य स्पर्धे’चे थाटात उद्घाटन

ठाणे महानगर पालिकेच्या उपायुक्तांवर कोविंड हॉस्पिटलच्या नर्सने केला गंभीर विनयभंगाचा आरोप..

राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण

शिर्डी येथे ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’चे उद्घाटन सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची भरभराट – हरिभाऊ बागडे

vishwatmaklokswamivarta