vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोयाबीन, भुईमूग बियाणे…

शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोयाबीन, भुईमूग बियाणे…

            सांगली, प्रतिनिधी : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन 2025-26 अभियानांतर्गत खरीप हंगामामध्ये सांगली जिल्ह्यात सोयाबीन व भुईमूग या पिकांसाठी प्रमाणित बियाणे 100 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्याकडे ॲग्रीस्टॅक नोंदणी असणे आवश्यक आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक लाभार्थींनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in farmer login या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

  यामध्ये 0.20 हेक्टर ते जास्तीत जास्त 1 हेक्टर मर्यादेत बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याकरिता लाभार्थींची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून करण्यात येणार असून, त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी सदर बाबीच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील सर्व शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी अर्ज मागविले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये सविस्तर चर्चा..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला🔸वाढत्या तणावावर तीव्र चिंता व्यक्त🔸 स्थैर्य टिकवण्यासाठी तणाव त्वरित कमी करण्याचे आवाहन

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा येत्या दि.28 एप्रिल रोजी मुंबईत महामोर्चा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र #चौंडी येथे ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ या जलजागृती यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानपरिषद सभापती सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

विदर्भ-मराठवाड्यात ‘दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2’ सुरु; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा मराठवाड्यातील सामाजिक सलोख्याची वीण विसकटू देणार नाही- पालकमंत्री पंकजाताई मुंडे

vishwatmaklokswamivarta