vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई सेंट्रलमध्ये दूध केंद्र स्टॉलला गाडीची जोरदार धडक, दूध केंद्र चालक नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत..

मुंबई सेंट्रलमध्ये दूध केंद्र स्टॉलला गाडीची जोरदार धडक, दूध केंद्र चालक नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत..

मुंबई : प्रतिनिधी –

मुंबई सेंट्रल येथील दूध केंद्र चालक सेनाकांत चंद्रकांत जाधव यांच्या दूध केंद्र स्टॉलला एका चार चाकी गाडीने धडक दिल्याने त्यांचे स्टॉलचे अतोनात नुकसान झाले असून सदर स्टॉल ची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सेनाकांत जाधव यांनी केली आहे. सेनाकांत चंद्रकांत जाधव यांचे दूध केंद्र स्टॉल हे गीतांजली बिल्डिंगजवळ डॉ. भडकमकर मार्ग, मुंबई सेंट्रल या ठिकाणी आहे. 26 मे 2019 रोजी रात्री 2.40 च्या सुमारास मोहम्मद इमरान आरिफ अहमद चष्मा वाला यांच्या ताब्यातील गाडीने त्यांच्या स्टॉलला धडक दिली व दूध केंद्राचे नुकसान केले. यासंदर्भात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी स्टॉलचे नुकसान झाल्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा न्याय दिलेला नाही उलट पक्षी त्यांनी गाडी चालकाला सहकार्य केल्याचे समजते. मला माझ्या स्टॉलचे झालेली नुकसान तात्काळ देण्यात यावे अन्यथा या संदर्भात मी पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेणार असे सेनाकांत जाधव यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा १३ डिसेंबरला  जिल्ह्यात १५ केंद्रांवर ३ हजार २२४ विद्यार्थी बसणार

vishwatmaklokswamivarta

तूर खरेदी प्रक्रियेत अडचण येणार नाही याची काळजी घेवून नियोजन करावे– पणन मंत्री जयकुमार रावल24 जानेवारीपासून राज्यात तूर खरेदी नोंदणी प्रक्रिया सुरु होणार..

vishwatmaklokswamivarta

ठाण्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची समीक्षा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महत्त्वाची आढावा बैठक

अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे

गुरुवारी(दि.6)जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश- मंत्री उदय सामंत