vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा रायगडावर शिवप्रेमींची प्रचंड गर्दी

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा रायगडावर शिवप्रेमींची प्रचंड गर्दी…

राज्य प्रतिनिधी-रायगड,: युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगडावर आज मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

छत्रपती संभाजी राजे आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय मानवंदना देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले. शिवभक्तांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण व पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शिवभक्तांनी लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण शिवमय झाल्याचे पाहायला मिळाले.किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी पार पडला. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण विभागचे संजय दराडे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीमार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या सोहळ्यानिमित्त विविध शासकीय विभाग व जिल्हा प्रशासनाने अन्नछत्र, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, सावलीसाठी मंडप, मोफत बससेवा आदी सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या होत्या.

हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वंदन करण्यासाठी आले होते.

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘बिमा सखी योजने’चा ऐतिहासिक शुभारंभ” – शिवराज सिंह चौहान

प्रेस फोटोग्राफर निनाजी भगत, रविकिरण टाकळकर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ.गजेंद्र निकम यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” योजनेच्या 19 व्या हप्त्याचेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण..शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे,ही कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नैतिक जबाबदारीच-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

vishwatmaklokswamivarta

सहकारी संस्थांच्या निवडणूक निर्णय अकारी निवडीसाठी31 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी १२०० कोटी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री- संजय शिरसाट 

vishwatmaklokswamivarta