vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी अशोक काकडे- संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रात्यक्षिक संपन्न…

संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी अशोक काकडे- संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रात्यक्षिक संपन्न…

        सांगली, प्रतिनिधी: संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी संभाव्य पूरपरिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. वेळोवेळी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी होऊन पूरपरिस्थितीवर मात करण्याची माहिती घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.     आयर्विन पूल सांगली येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) तसेच महानगरपालिका अग्निशमन दल यांनी संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व प्रत्यक्ष पूर परिस्थितीमध्ये येणाऱ्या समस्या हाताळण्याचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी अशोक काकडे व महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत दाखवले. त्या प्रसंगी जिल्हाधिकारी अशोक काकडे बोलत होते.

यावेळी अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त विजया यादव, अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, मिरज तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, सहाय्यक आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद, मंडल अधिकारी, तलाठी, स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, धनंजय कांबळे, याकुब मद्रासी तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.       जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यकता असलेल्या साहित्य आणि उपकरणे यांचे प्रदर्शन पाहून लाभ घेण्याचे आवाहन केले.     महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, मनपा प्रशासन महापुरासाठी सर्व तयारीनिशी तयार आहे. आवश्यक ते मनुष्यबळ, साहित्य तसेच पूरबाधित नागरिकांच्या निवाऱ्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना आदि सर्व तयारीसह संभाव्य आपत्तीसाठी आम्ही सज्ज असून महानगरपालिका टीम तयार आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. आपत्ती ॲप आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४×७ तयार असणार आहे. संपर्क क्रमांक तसेच संभाव्य पूरपातळीबाबत अद्ययावत माहिती देखील नागरिकांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

        यावेळी महापुरात बुडणाऱ्यांना बचावकार्य अंतर्गत करावयाच्या कृतीबाबत व बोटीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. एनडीआरएफ टीमचे प्रमुख संतोषकुमार तिवारी व त्यांची 24 जवानांची टीम तसेच अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील माळी व त्यांची 31 जवानांची टीम यांनी प्रात्यक्षिक दाखविले. मनपाच्या अग्निशमन दलाच्या 7 बोटी यावेळी तयार ठेवण्यात आल्या होत्या. त्याबरोबर आवश्यक असलेले सर्व साहित्यासह सर्व टीम उपस्थित होत्या. आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत आवश्यक असलेले साहित्य आणि उपकरणे इत्यादींचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आले होते.

0000

संबंधित पोस्ट

नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी 5-12 जानेवारी राहणार बंद…

vishwatmaklokswamivarta

आज अहमदाबादमधील अपघातस्थळी प्रधानमंत्री यांनी भेट दिली.दृश्य हृदयद्रावक होते.बचाव व मदत कार्यात झोकून देऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची व टीमची भेट घेतली.ही दुर्घटना अकल्पनीय आहे.ज्यांनी आपले प्रियजन गमावले,त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

राजेगाव येथील शेतकरी उगले यांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठींबा…

मोठी बातमी ,मुंबईतील घाटकोपर येथे डिसिल्व्हा कंपाऊंडमध्ये भीषण आग

मुख्यमंत्री महाराष्ट्र एकनाथ शिंदे सरकारच्या भवितव्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी.

vishwatmaklokswamivarta