vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सूवर्णसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सूवर्णसंधी

ठाणे, प्रतिनिधी- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि.16 जून 2025 ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत CDS कोर्स 65 आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

तरी, ठाणे/पालघर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे येथे दि.11 जून 2025 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील CDS-65 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेवून व ते पूर्ण भरुन सोबत घेवून यावे.

या CDS वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमूद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत:-अ) उमेदवार हा कोणत्याही शाखचा पदवीधर असावा,

आ) उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या CDS या परीक्षेकरीता ऑनलाईन द्वारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आयडी: training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉट्सअॅप क्र.9156073306 (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

नागरिकांच्या जीवनात सकारात्क बदल घडविण्यावर महसूल विभागाचा प्रयत्न -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूलमंत्र्यांच्या हस्ते ‘एम.ई.अे. इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो-२०२६’ चे उद्धाटन

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७७ ठिकाणी; तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ होणार *दादर येथे विशेष गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन**राष्ट्र-धर्म रक्षणासाठी गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हा !* – सनातन संस्थेचे आवाहन

मुंबईतील मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या सुमारे ४४२ पेक्षा अधिक प्रवाशांची  मुंबई अग्निशमन दलाने स्नॉर्केल (शिडी) वाहनांच्या साहाय्याने सुटका…

घणसोली विभागातील 21 शाळांमधील 13 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली ‘मतदार जागरूक दूत’ महाप्रतिज्ञा..

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री आवास योजनेच्या 5 लाख घरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते15 मे रोजी लोकार्पण- ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

वारकऱ्यांच्या सुरक्षितता, सुविधांना प्राधान्य देऊन समन्वयाने नियोजन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील