vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना येथील शासकीय वसतीगृहासाठी अर्ज करावेत

जालना येथील शासकीय वसतीगृहासाठी अर्ज करावेत

 जालना, प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागांतर्गत जालना शहरात सुरु असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह व संत रामदास मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जालना येथील शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता रिक्त जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया होणार आहे. सदर वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत भोजन, निवास, अंथरुण, पांघरुण, वह्या/पाठ्यपुस्तके देय असून मासिक निवार्हभत्ता, गणवेश भत्ता, शैक्षणिक साहित्य भत्ता, व छत्री, गमबूट भत्ता इत्यादी नियमाप्रमाणे आर्थिक लाभ विद्यार्थ्यांच्या आधारसलग्न बॅंक खात्यावर जमा करण्यात येतात. मागासवर्ग प्रवर्गातील अनुसूचित जाती, अनु.जमाती, विजाभज, इमाव/आदृमा, विमाप्र, दिव्यांग, अनाथ इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

शालेय अभ्यासक्रम (वर्ग 8 वी ते 10 वी ), कनिष्ठ महाविद्यालय अभ्यासक्रम (11वी ते 12वी), बिगर व्यावसायीक वरिष्ठ महाविद्यालय अभ्यासक्रम व व्यावसायीक अभासक्रम या चार अभासक्रमांचे प्रथम वर्षात प्रवेशित होणारे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत. दिनांक 11 जून 2025 पासून http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी व अर्ज सादर करता येतील, अशी माहिती वसतिगृहांचे गृहपाल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आहे

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकाऱ्यांचा प्रेरणादायी पुढाकार; टीबी रुग्णाला सहा महिन्यांसाठी दत्तक

कर्जत व जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी भवन उभारण्याच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करावी-महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे संचालक (पणन) यांना निर्देश

भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्या भास्कर आबा दानवे यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह,माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे यांना निवेदन

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा पर्यावरणस्नेही पर्यटन (इको टूरिझम) यादृष्टीने देखील विचार व्हावा,महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक

आणीबाणीच्‍या काळात कारावास भोगलेल्या व्‍यक्‍तींनी अर्ज करावेत..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा यांच्यात नाशिक बैठकीत वाद विवाद तुफान राडा, नेते बैठक सोडून गेले