vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ॲग्रीस्टॅक नोंदणी, शून्य प्रलंबितता कामे पूर्ण करा- जिल्हाधिकारी स्वामी

ॲग्रीस्टॅक नोंदणी, शून्य प्रलंबितता कामे पूर्ण करा- जिल्हाधिकारी स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी शेतकऱ्यांना फार्मर्स आयडी मिळवून देण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी, शून्य प्रलंबितता ही कामे वेळेत पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व तालुकास्तरीय यंत्रणांची आढावा बैठक घेतली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी संगिता राठोड जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदी दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेतला. तसेच जलसमृद्ध गाव, स्मशानभुमी समस्या निवारण, शून्य प्रलंबितता, वृक्ष लागवड अभियान, ॲग्रीस्टॅक नोंदणी या उपक्रमांचा आढावा घेतला. १० जून अखेर सर्व कार्यालयांत शून्य प्रलंबितता करण्यात यावी. त्यासाठी प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी प्रत्यक्ष खात्री करुन अहवाल द्यावा. जलसमृद्ध गाव अभियानात गावात करण्यात आलेले विहीर पुनर्भरण, बोअर पुनर्भरण, छतावरील पाण्याचा जलसंचय अशा विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. शून्य प्रलंबितता अंतर्गत जुनी प्रकरणे, नागरिकांच्या तक्रारी, लोकप्रतिनिधींची पत्रे आदींचा निपटारा करावा,असे निर्देश देण्यात आले.

०००००

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली जायकवाडी समांतर पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी…

राज्यपालांची राजभवन येथील कर्करोग जनजागृती शिबिराला भेट

लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी-पुरवणी मागण्यांमध्ये 3 कोटी 32 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी..

फनेल झोन आणि मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशन निर्बंध बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला गती द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• विमानतळ फनेल झोन आणि जुहू मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशन निर्बंध बाधित इमारतींबाबत बैठक

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषदेत महत्वाचे विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

vishwatmaklokswamivarta

चनेगावात भर उन्हाळ्यात नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा वेळेवरनियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती नाही वेळेवर टँकर येत असल्याने नागरिकांना दिलासा