vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कल्याण येथील मुलामुलींचे शासकीय वसतिगृह येथे रिक्त जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु

कल्याण येथील मुलामुलींचे शासकीय वसतिगृह येथे रिक्त जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु

ठाणे, प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय विभाग, मंत्रालय मुंबई अंतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात इयता 8 वी पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या व महाविद्यालयीन विभागातील प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच मागासवर्गीय मुलांचे गुणवंत शासकीय वसतिगृह, कल्याण पश्चिम, गौरिपाडा येथे वर्ग 11वी, 12वी, पदविका / आटीआय 10वी उर्तीण अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांकरिता सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृहात रिक्त असणाऱ्या जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु आहे. वसतिगृह प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने https://hms.mahait.org या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना भरता येतील. हे पोर्टल दि.11 जून 2025 पासून सुरु होणार आहे.

अर्जासोबत लागणारी प्रमाणपत्रे (अपलोड करावयाची कागदपत्रे):- गुणपत्रिका, टि.सी., जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी), उत्पन्नाचा दाखला (रु.2 लाख 50 हजाराच्या आत प्राधिकारी), रहिवासी दाखला (सरपंच/तलाठी/नगरसेवक), आधार कार्ड, शाळा/ महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र अथवा प्रवेश पावती, आधार संलग्न बँक खाते पास बुकच्या पहील्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो.या ऑनलाईन पध्दतीने भरण्यात आलेल्या प्रवेश अर्जाची छायांकीत प्रत गृहपाल, मागासवर्गीय मुलांमुलीचे शासकीय वसतिगृह, मानसरावर शॉपींग कॉम्पलेक्स, पहिला व दुसरा माळा, भिवंडी येथे जमा करण्यात यावी. अधिक माहितीकरिता प्र.ना. मडावी गृहपाल मो. क्रमांक ९७६७६१२८९७/८७९३५८७७२१ व सरोजा सपकाळ प्र गृहपाल मो. क्र ९०११२३४५१६ यांच्याशी संपर्क साधावा.शासन निर्णय 26 जुलै 2011 अन्वये विनामुल्य देय सोई सुविधा:- दोन वेळेचे पोटभर जेवण, सकाळी नाश्ता /दुध /फळे 2 अंडी, शैक्षणिक साहित्याकरिता नियमानुसार डिबीटीद्वारे देय रक्कमा शैक्षणिक स्टेशनरी प्रती वर्ष 4 हजार, गणवेश रु. 1 हजार, शालेय रु.2 हजार, महाविद्यालयीन (ड्रेस कोड लागु असल्यास), शैक्षणिक सहल रु. 2 हजार प्रती वर्ष, प्रती प्रकल्प रु.1 हजार, दरमाह रु.500/- निर्वाह भत्ता. उपलब्ध सोई सुविधा: सुसज्य संगणक कक्ष, ग्रंथालय सुविधा, मनोरंजाना करिता टीव्ही, क्रीडा साहित्य, दैनंदिन वर्तमान पत्रे 5 व स्पर्धात्मक परिक्षेकरिता स्पर्धा परिक्षा मासिके पुरविण्यात येतात, असे मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृह कल्याण जि.ठाणे गृहपाल प्र.ना मडावी यांनी कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमधील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दात्यांना जुलै 2025 साठीचा जीएसटीआर -3 बी दाखल करण्याच्या अंतिम कालमर्यादेला मुदतवाढ

शिराळा नगरपंचायत प्रभाग क्र. 4 मतदानासाठी संबंधित शाळांना सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेचा 6704.43 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महासभेत सादर-स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील यांनी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्याकडे सादर केला अर्थसंकल्प…

आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड, अहिल्यानगर येथे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

अमेरिका इजराइल-इराण संघर्षामुळे आजची परिस्थितीवर उद्योगपती आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक काय म्हणाले ते पहा