vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शाळेच्या पहिल्या दिवशी होणार विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; विविध उपक्रमांचे आयोजन

शाळेच्या पहिल्या दिवशी होणार विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; विविध उपक्रमांचे आयोजन

लातूर, प्रतिनिधी: सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उद्या, 16 जून 2025 रोजी होत असून, लातूर जिल्ह्यातील शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश, बूट आणि सॉक्स वितरित केले जाणार असून, त्यांचे पहिले पाऊल अविस्मरणीय ठरावे यासाठी पायांचे ठसे घेण्याचा विशेष उपक्रम राबविला जाईल.

जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय 147 अधिकाऱ्यांनी 230 शाळा दत्तक घेतल्या असून, या शाळांमध्ये पटवाढ आणि गुणवत्तावृद्धीसाठी वर्षभर प्रयत्न केले जाणार आहेत.

एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. शाळा परिसरातही वृक्षलागवड आणि स्वच्छता मोहीम राबविली गेली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले असून, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना गोड पदार्थ दिला जाईल.

जिल्हा परिषद शाळांचा पट 25 टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले असून, यासाठी जनजागृती मोहीम राबविली जात आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, शिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती आणि उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी पालकांना आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित पोस्ट

भारताने मेरठ येथील आरव्हीसी सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त घोड्यांचे रोगमुक्त क्षेत्र केले स्थापन

शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास टप्पा दोनच्या रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील अठरा नंबर प्लॅटफॉर्म सुमारे तीन महिन्यांसाठी बंद.

vishwatmaklokswamivarta

विशेष साहाय्य विभागाच्या जनकल्याण यात्रेचा शुभारंभ जनकल्याण यात्रेद्वारे योजनांचा होणार जागर : मंत्री नरहरी झिरवाळ

मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली

ऑटोरिक्षा, मीटर्ड टॅक्सी चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन