vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग,विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी …

 दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग,विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी …

राज्य प्रतिनिधी- दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलंय. अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. तेव्हापासून अनेक विमानांचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले. आता इंडिगोच्या विमानाचे देखील इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आल्याने खळबळ उडालीये. या विमानाची नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलीये. हे विमान कोचीहून दिल्लीला निघाले असताना विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. यानंतर नागपूर विमानतळावर हे विमान उतरवण्यात आले.

विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग प्रवाश्यांमध्ये भितीचे वातावरण,विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग करून लगेचच प्रवाश्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यानंतर संपूर्ण विमानाची तपासणी केली जातंय. खरोखरच विमानात बॉम्ब ठेवण्यात आलाय का? याची तसापणी सध्या सुरू आहे. या धमकीकडे जास्त गांर्भीयाने बघण्यासाठीचे महत्वाचे कारण म्हणजे धमकी देणाऱ्याने याच विमानाचा बरोबर नंबर नमून केला होता. ज्यावेळी ही धमकी देण्यात आली, त्यावेळी विमान कोचीहून निघाले होते.

सुरक्षेच्या कारणांमुळे विमानाला नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानात 157 प्रवासी होते. मंगळवारी सकाळी 9.20 ला इंडिगो विमान 6E- 2706 कोची विमानतळावरून निघाले. विमान निघून काही वेळातच विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. ही धमकी मिळाल्यानंतर पायलटने लगेचच याबद्दलची माहिती नागपूर विमानतळाच्या एटीएसला संपर्क साधला आणि इमर्जन्सी लॅण्डिंगची परवानगी मागितली.

विमानातील 157 प्रवासी सुरक्षित,परवानगी मिळाल्यानंतर लगेचच विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले. याबद्दल माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक आणि पोलीस विमानतळावर पोहोचले. सध्या तपास सुरू असल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून सतत अशाप्रकारे धमक्या मिळण्याचे प्रवास वाढल्याचे बघायला मिळत आहे.

संबंधित पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा-2025उमेदवारांनी/परीक्षार्थ्यांनी युट्यूब चॅनल्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे प्रसारित अफवांवर विश्वास ठेवू नये…

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बालनिरीक्षणगृहांना भेट

vishwatmaklokswamivarta

एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे एज्युसिटी व मेडिसिटी संदर्भात आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !वारकरी महाअधिवेशनात निर्धार : तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त व्हावीत; धर्मांतर थांबवण्यासाठी कठोर कायद्याची मागणी!

vishwatmaklokswamivarta

इस्त्राईल देशात होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स पदासाठी संधी..

vishwatmaklokswamivarta

भूजल स्त्रोत नकाशांकनाविषयीजिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta