vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

दिव्यांग व्यक्तींना ई व्हेईकलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

दिव्यांग व्यक्तींना ई व्हेईकलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

जालना, प्रतिनिधी :- दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने सन 2024-25 मध्ये हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यात आली आहे.

योजनेचे उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे आहे.

योजनेचा लाभ राज्यातील गरजु दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदारांनी नाव नोंदणीसाठी पोर्टल दि. 22 जानेवारी 2025 रोजी प्रक्षेपित करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://register.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. दि. 6 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींना घेण्याचे आवाहन महाराष्ट्र्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. चे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित पोस्ट

परिवहन व बंदरे विभाग-राज्यात ॲप बेस वाहनांसाठी धोरण लागू

मुरुड येथील आमदार रमेशआप्पा कराड यांच्या जनता दरबारला अभूतपूर्व प्रतिसाद,प्रलंबित समस्यांचा जनता दरबारात नागरिकांनी वाचला पाढा

जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा..

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे ६० जप्त वाहनांचा २७ मे रोजी ई-लिलाव* *इच्छुकांनी २१ मे पूर्वी नोंदणी करावी

डॉ गोविंदराज यांनी केला क्षेत्रीय पाहणी दौरा, शेतकरी, क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी साधला संवाद.

vishwatmaklokswamivarta

फौजदारी प्रकरणातील कार्यवाहीबाबत महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण स्तुत्य – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार