vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्जाची 17 जुलैपर्यंत अंतिम मुदत…

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्जाची 17 जुलैपर्यंत अंतिम मुदत…

 बुलडाणा, प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, बुलडाणा जिल्हा कार्यालयामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये सरासरी 60% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गुणांनुसार व निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह दि. 17 जुलै पर्यंत कार्यालयीन वेळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या.,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,चिखली रोड, बुलडाणा. येथे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. जे.एम. गाभणे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

ग्यानबा तुकाराम.. आश्वासनातले किती झाले काम..? असे म्हणत जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी विचारला सत्ताधार्‍यांना सवाल-भाऊ आणि दादा क्या हुआ तुम्हारा वादा..शिवसेनेच्या घोषणेने परिसर दणाणला..

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी केली पाहणी…

vishwatmaklokswamivarta

३० खाटांच्या रुग्णालयांना जन आरोग्य योजनेत समावेश करता येणार १० खाटांच्या एकल विशेषता रुग्णालयांनाही संधी पॅनलवर समावेशासाठी रुग्णालयांनी ऑनलाइन अर्ज करावा जिल्हा शल्यचिकीस्तक डॉ दत्तात्रय बिरासदार यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सव बोधचिन्हाचे अनावरण महाबळेश्वर येथे २ ते ४ मे दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन…

मेळघाटात 10 मोबाईल टॉवरला मंजुरी*जिल्हा सनियंत्रण समितीची मान्यता