vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष हेतू कंपनीस भाडेपट्टा कराराच्या मुद्रांक शुल्कात सवलत…

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष हेतू कंपनीस भाडेपट्टा कराराच्या मुद्रांक शुल्कात सवलत…

          राज्य प्रतिनिधी-  धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी (SPV) आणि अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

  धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी विशेष हेतू कंपनी (Special Purpose Vehicle) स्थापन करण्यात आली आहे. तिच्या माध्यमातून या परिसराचा एकत्रित पुनर्विकास करण्यात येत आहे. पुनर्वसन व पुनर्विकासाच्या योजनेला अत्यावश्यक नागरी प्रकल्प तसेच विशेष प्रकल्प म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. अशा अत्यावश्यक नागरी प्रकल्पांसाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचे किंवा ते माफ करण्याचे धोरण यापुर्वीच निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने या प्रकल्पातील रेल्वे जमीन विकास प्राधिकरण, नवी दिल्ली आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प किंवा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) मुंबई यांच्यामध्ये होणाऱ्या पोट भाडेपट्ट्याच्या करारासाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा प्रस्ताव होता. तसेच भाडेपट्ट्यांच्या या दस्त प्रकारांचा सवलत धोरणात समावेश करावा असा प्रस्ताव होता. त्यानुसार या दस्त प्रकारांचा सवलत धोरणात समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. जेणेकरून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला चालना मिळेल.

००००

संबंधित पोस्ट

विशेष भारत मोशन पिक्चर असोसिएशनसोबत जागतिक स्तरावर उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

मुख्य सचिव तथा ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे 100 दिवस कृती आराखडा आढावा बैठक संपन्न..जिल्ह्यातील विकासात्मक प्रकल्प गतीने पूर्ण करावेत-मुख्य सचिव तथा पालक सचिव सुजाता सौनिक

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा जिल्हा स्तरीय शालेय जलतरण स्पर्धेला आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते उत्साहात प्रारंभ राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नामांकित जलतरणपटू श्री शुभम वनमाळी यांची विशेष उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta

सीआयडी चा अहवाल -वांद्रे येथील निवासस्थानातून गोळा केलेले बोटांचे ठसे आरोपीच्या बोटांच्या ठशांशी जुळले नाही, बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण..

vishwatmaklokswamivarta

वसमत नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवणार- उद्योग मंत्री उदय सामंत

महसूल गुप्तचर संचालनालयाने ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन अंतर्गत वलसाड येथील अल्प्राझोलम बनवणारा कारखाना उध्वस्त करून बहु-राज्यीय ड्रग्ज नेटवर्क आणले उघडकीला ; 22 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त; चार जणांना अटक

vishwatmaklokswamivarta