vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जिल्हा परिषद ठाणे येथे २४ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून पदोन्नत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा..

जिल्हा परिषद ठाणे येथे २४ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून पदोन्नत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा..

द ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत आज, दि. १९ जून, २०२५ रोजी शिपाई संवर्गातून २२, वाहनचालक संवर्गातून २, असे एकूण २४ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक (वर्ग-३) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.     या पदोन्नतीविषयी माहिती देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) अविनाश फडतरे यांनी सांगितले की, “कार्यक्षमतेच्या आधारे पदोन्नतीची ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली असून, समुपदेशनाने पदोन्नती प्रक्रिया पार पाडली आहे.”      या पदोन्नतीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सर्व नवपदोन्नत कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना असे सांगितले की “पदोन्नती ही केवळ पदवृद्धी नसून, आपल्या सेवाभावाला, प्रामाणिकपणाला आणि कार्यक्षमतेला मिळालेली पावती आहे. नव्या जबाबदाऱ्या ही संधी आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रगतीला हातभार लावण्याची. आपण सर्वांनी एकजुटीने जिल्हा परिषद ठाणेची कामगिरी अधिक समृद्ध आणि उल्लेखनीय बनवावी, हीच माझी मनःपूर्वक शुभेच्छा!”.

  यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) प्रमोद काळे, कार्यकारी अभियंता प्रकाश सासे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.       या कर्मचाऱ्यांच्या सेवेत झालेल्या पदोन्नतीमुळे कार्यालयीन कार्यप्रवाह अधिक प्रभावी व परिणामकारक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे..

000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका  पाणी बचतीबाबतचे नियोजन• नागरिकांमध्ये विविध माध्यंमाद्वारे पाणी बचतीवाचत आवाहन करण्यात येत आहे.

५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण-बाल वैज्ञानिक देतील देशाच्या प्रगतीत योगदान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

चवदार तळ्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता,कार्यक्रम दिमाखदार करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना…

आदिवासी भागाच्या विकासासाठी ‘सीएसआर फॉर चेंज’ उपक्रम

vishwatmaklokswamivarta

रेवा ते पुणे आणि जबलपूर ते रायपूर या दोन इतर गाड्यांना व्हर्च्युअल पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला.भावनगर रेल्वे स्थानकावर देशातील १३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठा स्टेशन पुनर्विकास प्रकल्प..

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta