vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन..

पुणे प्रतिनिधी: आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे शुक्रवार (२०) रोजी दर्शन घेतले. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली.

मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, गुरु शांतिनाथ, राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे, पुरुषोत्तम पाटील, पालखी विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त प्रमोद बेंगरूट, शिवाजीराव जगदाळे, गोरख भिकुले आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारी निमित्त पालखीसोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी विठ्ठल नामाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे विठ्ठल मंदिरात आगमन झाले. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वारकरी व भक्तगण उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

पारधी, फासे पारधी समाजाने योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन* अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत…

vishwatmaklokswamivarta

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे 8 जुलै रोजी सत्कार;”भारताची राज्यघटना” विषयावर संबोधन..

vishwatmaklokswamivarta

सांगली सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या जलद विस्ताराबाबत जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा ‘नवीन वर्ष सर्वांना विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करुन देणारं; राज्याला सर्वांगीण विकासाच्या, प्रगतीच्या वाटेवर नेणारं ठरेल’ – उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडा – जिल्हाधिकारी अशोक काकडे- महा-TET परीक्षा २०२५ सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta