vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

क्षय आरोग्य धाम येथे योगासन व ध्यान योग कार्यक्रम

क्षय आरोग्य धाम येथे योगासन व ध्यान योग कार्यक्रम

बुलडाणा, प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने क्षय आरोग्य धाम, बुलडाणा येथे रुग्णालय परिसरात योगासन व ध्यान योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील चव्हाण होते. कार्यक्रमाला डॉ. कोठारी सर, डॉ. हेलगे मॅडम, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नॅचरोपॅथीतज्ञ डॉ. मंजू जाधव यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमात परिसरातील अधिकारी, परिसेविका, कार्यालयीन लिपिक वर्ग, पॅरामेडिकल स्टाफ, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.डॉ. मंजू जाधव मॅडम यांनी योग म्हणजे काय, अष्टांग योग, यम-नियम, आहार-विहार आदी बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. योगशिक्षिका कु. कालींदा जायभाये यांनी “कर्मयोगी व्हा आणि कामासोबत योगाची सांगड घाला” या उक्तीला अनुसरून सूक्ष्म हालचालींचे महत्त्व, त्याचे फायदे, काळजी व लाभ याविषयी सखोल माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात विश्वप्रार्थनेने झाली. यानंतर शरीराच्या सूक्ष्म हालचाली, विपरीत स्थिती, दंड स्थिती, बैठक स्थिती व शयन स्थितीत विविध योगासने करण्यात आली. प्राणायाम, कपालभाती, त्राटक, शोधन मुद्रासहित भ्रामरी, ध्यान, धारणा व संकल्प घेण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप शांतीपाठ व सामूहिक जेवणाने करण्यात आला.

सदर कार्यक्रम योग दिनाच्या निमित्ताने योगाचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने यशस्वीरीत्या संपन्न झाला असून, यामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली

संबंधित पोस्ट

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीरोगतज्ञ विशेषज्ञ प्राध्यापिका डॉ. राजश्री दयानंद कटके एक अविस्मरणीय किमयागार…

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच यशस्वी ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ (गुडघा प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया संपन्न 

राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम; आयुष्मान भारत–महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोठ्या सुधारणा लागू

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ जिल्हा स्त्री रुग्णालय येथे थेट प्रक्षेपणाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यासाठी आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल-अंथरुणावरच्या रुग्णांना दिलासा पॅलिएटिव्ह केअर सेवेचा प्रारंभ

vishwatmaklokswamivarta

मेळघाट आरोग्य परिक्रमेत डॉक्टरांनी सक्रीय सहभाग नोंदवावा -जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta