vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी अर्ज करावेत

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी अर्ज करावेत

 जालना प्रतिनिधी) : बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सन 2025-26 या वर्षात जिल्हा परिषदेस 32 लक्ष रुपये निधी शासनाकडुन मंजुर करण्यात आला आहे. तरी जालना जिल्ह्यातील अनुसुचित जमाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घेण्यात यावा, असे अवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश मिनियार व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी केले आहे.

अनुसुचित जमाती प्रर्वगातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीसाठी अर्थ सहाय्य देण्याची सन 1992-93 पासुन राबविण्यात येत असलेली विशेष घटक योजना दि. 30.12.2017 च्या शासन निर्णयाव्दारे बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना या नावाने राबविण्यात येते. या योजनेस शासनाच्या सामाजिक न्याय विभागा कडुन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर यावे मार्फत जिल्हा परिषदेस निधी उपलब्ध करुन दिला जातो. सन 2020-21 पासुन महाडीबीटी पोर्टलव्दारे या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असुन या योजनाअंतर्गत ऑनलाईन अर्ज स्वीकृती पासुन लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान अदा करण्यापर्यतची सर्व सुविधा महाडीबीटी पोर्टलव्दारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना पुढिल प्रमाणे खालील घटकासाठी त्यापुढे नमुद रक्कमेच्या उच्चयतम अनुदान मर्यादेत राबविण्यात येते. लाभासाठी संपर्क तालुकास्तरावर पंचायत समितीमधील कृषि अधिकारी तर जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेतील कृषि विकास अधिकारी यांच्याकडे साधावा. असेही कळविले आहे.

संबंधित पोस्ट

शेतीच्या व्यवहरातुन फसवणूक केल्या प्रकरणाी तालुका पोलीस स्टेशन येथे 420 चा गुन्हा दाखल

लाड -पागे समितीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती आणि आवास योजनेचा लाभ द्या- शेरसिंग डांगोर

सन 2024-25 “विभागीय हातमाग कापड स्पर्धा” चे आयोजन

सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षात संधी देऊ-अरविंद चव्हाण  मोदीखाना भागातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश …

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जमाती कल्याण समितीची शाळा, आरोग्य केंद्राला भेटी

अलिबागमध्ये शिवजयंतीनिमित्त समुद्र किनारा स्वच्छता मोहीम..

vishwatmaklokswamivarta