vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

ब्युटी पार्लर व्यवसाय प्रशिक्षण’ – तरुणाईसाठी सुवर्णसंधी

‘ब्युटी पार्लर व्यवसाय प्रशिक्षण’ – तरुणाईसाठी सुवर्णसंधी

राज्य प्रतिनिधी- बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान(RSETI) रायगड तर्फे रायगड जिल्ह्यातील युवक आणि युवतींसाठी ३५ दिवसीय निवासी “ब्युटी पार्लर”व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात १० नोव्हेंबर २०२५ रोजी पंतनगर, अलिबाग येथे होणार असून हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे.

 या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थीनाब्युटी पार्लर क्षेत्रातीलबेसिक ते अॅडव्हान्स तंत्रांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती — जसे की मार्केटिंग, बँकेच्या विविध योजना, ठेवी, संवाद कौशल्य आणि उद्योजकतेसाठी आवश्यक आत्मविश्वास — या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.संस्थेकडून प्रशिक्षणार्थीसाठी चहा, नाश्ता, जेवण तसेच राहण्याची सोय मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.

या उपक्रमामागचा मुख्य उद्देश रायगड जिल्ह्यातील युवक आणि युवतींना स्वावलंबनाच्या दिशेने मार्गदर्शन करणे आणि ब्युटी क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभारण्याची प्रेरणा देणे हा आहे. ब्युटी पार्लर व्यवसाय हे महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारे एक उत्तम व्यावसायिक क्षेत्र ठरू शकते, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.

इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी दिलेल्या लिंक https://forms.gle/bWTCCxPTt7vFEShSAवर जाऊन अथवाQR कोड स्कॅन करून आपले नाव नोंदवावे. मर्यादित जागा असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क:स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान, रायगड (RSETI)१ ला मजला, पुष्कराज बंगला, पंतनगर, अलिबाग, जि. रायगड फोन नं. ०२१४१–२२२२१४/७०३०२८४८८४/७५५८६०६७६५/९६०७५०२३७५

000000

संबंधित पोस्ट

जागतिक युवा दिना निमित्त कौशल्य सप्ताहाचे औचित्य साधून करीअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या-  योजनेचा लाभ मिळण्याकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत 

फलटण व कोरेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदांची भरती

vishwatmaklokswamivarta

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाला गती

अमेरिका इजराइल-इराण संघर्षामुळे आजची परिस्थितीवर उद्योगपती आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक काय म्हणाले ते पहा

डाक विभागात एजंटसाठी अर्ज मागविले; 17 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta