vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे उद्घाटन

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे उद्घाटन

पुणे, प्रतिनिधी- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी या सफारीचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

यावेळी वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे, इंदापुरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर आदी उपस्थित होते.

मंत्री भरणे यांच्या हस्ते पुणे वनविभागाकडून एकूण ३ जिप्सीधारकांना प्रत्येकी १ लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले तसेच कडबनवाडी गवताळ प्रदेशाच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले.

मंत्री भरणे यांनी कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशाची स्वतः सफारी केली. नागरिकांनीही या सफारीचा आनंद घेऊन याबाबत इतर नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी कडबनवाडी वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जलभूषण भजनदास पवार, सदस्य दादासाहेब जाधव, सरपंच संगिता गावडे, उपसरपंच कडबनवाडी, अड. सचिन राउत, फ्रेंडस ऑफ नेचर क्लब, निमगाव केतकी व त्यांचे सदस्य आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यातील ‘नीट’ परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूर जिल्हा-लातूर जिल्ह्यात रात्रभर संततधार पाऊस सुरू असून खालील मार्गावर पुलावर पाणी आल्याने सदर मार्गावरील एस. टी.बस वाहतूक बंद विविध ठिकाणी पावसामुळे बंद असल्याने नागरिकांच्या माहितीकरिता

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी…

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य; अकोला जिल्ह्यातील ४३ खेळाडूंना शिष्यवृत्ती, २१ बॉक्सिंगपटूंची चमक

vishwatmaklokswamivarta

आदिवासींची समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपणे ही सर्वांची जबाबदारी–आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके*

मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश! मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सरकारने खालील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत

vishwatmaklokswamivarta