vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा…

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे कोकण किनारपट्टीला 28 जून 2025 रोजीचे 5.30 पासून ते 30 जून 2025 रोजी 11.30 पर्यंत 3.4 ते 4.9 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

राज्यात मागील 24 तासांमध्ये (29 जून 2025 रोजी सकाळपर्यंत) रायगड जिल्ह्यात 20.8 मिमी पाऊस झाला आहे. तर पालघर जिल्ह्यात 20.7, सिंधुदुर्ग 13.5, ठाणे जिल्ह्यात 13.4 मिमी, आणि रत्नागिरी जिल्ह्यात 12 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.राज्यात कालपासून आज 29 जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे 13.4, रायगड 20.8, रत्नागिरी 12, सिंधुदुर्ग 13.5, पालघर 20.7, नाशिक 5.5, धुळे 5.1, नंदुरबार 8.1, जळगाव 2.9, अहिल्यानगर 0.4, पुणे 5, सातारा 5.5, सांगली 4.5, कोल्हापूर 11.5, छत्रपती संभाजीनगर 0.7, जालना 0.6, नांदेड 0.2, परभणी 0.1, हिंगोली 1.2, बुलढाणा 2.3, अकोला 4, वाशिम 4.9 अमरावती 2.3, यवतमाळ 1.9, वर्धा 2.5, नागपूर 6.8, बुलढाणा 7.3, गोंदिया 17.6, चंद्रपूर 3.6 आणि गडचिरोली जिल्ह्यात 5.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यू व एक व्यक्ती जखमी झाली आहे. तर अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मौजा वह्या कुहा येथील एक शेतकरी पेरणी करत असताना ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

संबंधित पोस्ट

इलेक्ट्रीक बसेसच्या माध्यमातून प्रदूषणास आळा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील महापालिकेच्या ई- बस सेवा डेपोचे बांधकाम, विद्युतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्रपुरस्कारासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे- प्र. संचालक अशोक गाडेकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कौशल्य आत्मसात करा, आत्मविश्वासाने पुढे जा – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर**लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप अकादमीतील विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद*उद्योगाभिमुख प्रशिक्षणातून स्थानिक तरुणांसाठी रोजगार व उद्योजकतेच्या संधी

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२७ मध्ये वैकल्पिक विषय रद्द, मुलाखतीचे गुण १७५

एन्व्हायरोटेक एशिया 2026′ परिषदेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे जल व्यवस्थापनावर प्रभावी सादरीकरण…

शहापूरच्या शाळेची मान्यता रद्द झाली तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये – रूपाली चाकणकर