vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची घेतली भेट* 

*केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची घेतली भेट*

जालना/ मुंबई  : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा वातावरण तापत असताना, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी रविवारी रात्री अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास अर्ध्या तासाची सविस्तर चर्चा झाली. येत्या २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलन करण्याचा मनसुबा जाहीर करत जरांगे-पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर एल्गार पुकारला आहे. या भेटीत मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे सुपूर्द केलं असून, याबाबत आठवले लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.“मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. मात्र काही मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण पुरेसं आहे का, टिकेल का, याबाबतची शंका समजू शकते. ज्यांच्या कुणबी नोंदी उपलब्ध नाहीत, त्यांच्या समर्थनार्थ हैदराबाद, सातारा, आणि बॉम्बे संस्थानचे गॅझेट लागू करण्याचा विचार व्हावा,” असं ना .रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केलं.“२९ ऑगस्टपूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. ती मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी आश्वासन देतो,” असंही ना.रामदास आठवले म्हणाले. तसेच, “मराठा समाजातील गरीब, मागास मुलांना शिक्षण व नोकरीत आरक्षणाची संधी मिळावी, ही मागणी मी सर्वप्रथम केली होती,” असं सांगून त्यांनी पुन्हा आपली भूमिका अधोरेखित केली.

संबंधित पोस्ट

जनाई उपसा सिंचन योजनेच्या रायझिंग ते बोरकरवाडी तलावापर्यंतच्या पाईपलाईनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

दिव्यांगांची क्षमता पाहून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत   – जिल्हाधिकारी अशोक काकडे- जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात…

vishwatmaklokswamivarta

जालन्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमींचे पोलिसांना निवेदन..

छत्रपती संभाजी नगर मधील जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं मुंबईत निधन, संगीत क्षेत्रातील चिरतरुण सूर हरपला, सर्वत्र शोकभावना.♦️आशा भोसले यांनी अखेरच्या श्वासापर्यंत संगीताची सेवा केली — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी*परीक्षा केंद्रावर 2023 चे कलम 163 प्रमाणे आदेश लागू*

vishwatmaklokswamivarta