vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा सांख्यिकी कार्यालयात “राष्ट्रीय सांख्यिकी दिवस” साजरा

जिल्हा सांख्यिकी कार्यालयात “राष्ट्रीय सांख्यिकी दिवस” साजरा

गडचिरोली, प्रतिनिधी:विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपुर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्म दिवस ’29 जून’ हा दिवस दरवर्षी ” राष्ट्रीय सांख्यिकी दिन ” म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन 2007 पासून केंद्र शासनाने घेतला आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा सांख्यिकी कार्यालय, गडचिरोली येथे दिनांक 29 जून, 2025 रोजी ज्ञानेश्वर बा. खडतकर, उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली “राष्ट्रीय सांख्यिकी दिवस” साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात अध्यक्षांनी जेष्ठ सांख्यिकी शास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या सांख्यिकी शास्त्रातील अनमोल योगदानाबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. यावर्षी शासनाने ठरवून दिलेल्या “75 Years of National Sample Survey” या विषयावर आणि प्राध्यापक महालनोबिस यांच्या योगदानाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी उपयोजित अर्थशास्त्र विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील सहायक प्राध्यापक डॉ. धैर्यशील खामकर, उपस्थित होते. सदर कार्यक्रमात जिल्हा सांख्यिकी कार्यालय, गडचिरोली, जिल्हा नियोजन समिती तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालयतील जिल्ह्यातील विविध विभागात काम करणारे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील वनकावार, सहायक संशोधन अधिकारी यांनी पार पाडले. शेवटी कार्यक्रमाची सांगता व आभार प्रदर्शन रमेश गं. निखारे, अन्वेषक यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

0000

संबंधित पोस्ट

लातूर येथील विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे-. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव काळात विविध बाबींसाठी मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काम सर्व यंत्रणांनी समन्वयाने करावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध योजना; अर्ज सादर करण्याचे आवाहन

महिलांना खऱ्या अर्थाने समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – वनमंत्री गणेश नाईक ‘माविम सुवर्ण महोत्सव- नव तेजस्विनी २०२५’ चे उद्घाटन

हिवरखेडे मका प्रकरणी चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई- मंत्री छगन भुजबळ