vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा वमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा वमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

रायगड( प्रतिनिधी- दि.15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने दि.15 जुलै, 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 या वेळेत डॉ. के.एम. वासुदेवन पिल्लई कॅम्पस, प्लॉट न. 10, सेक्टर 16 न्यू पनवेल  इस्ट ता. पनवेल  येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजित  करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार रायगड-अलिबाग यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्व खाजगी उद्योजकांनी आपल्या आास्थापनेतील कुशल/अकुशल रिक्तपदे जास्तीत जास्त या कार्यालयास कळविण्यात यावीत. शासनाच्या माध्यमातून खाजगी कंपन्यातील जास्तीत-जास्त रिक्तपदे रोजगार मेळाव्यातून भरती करण्यात येणार आहे. याकरिता या विभागाचे संकेतस्थळावर https://rojgar.mahaswayam.gov.in नोंदणी केलेल्या आस्थापनांनी प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती भरावी. ही माहिती भरताना प्रथम उपरोक्त संकेतस्थळावर Employment – Employer (List a Job)- Employer Loginया क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील  PanditDindayalUpadhyay Job Fair  या ऑप्शनमधून दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्ह्याच्या नावावरील View Details – Job Details – Agreeand Post Vacancy-Add New Vacancy ऑप्शनवर क्लीक केल्यानंतर रिक्तपदांची माहिती भरुन शेवटच्या पानावरील  Save Vacancy वर क्लीक करावे. त्याचप्रमाणे ज्या आस्थापनांची यापूर्वी उपरोक्त संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आलेली नाही त्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.inया संकेतस्थळावरEmployment-Employer (List a Job)-Registerया क्रमाने जाऊन नवीन नोंदणी करावी व आपल्या आस्थापनेची नवीन नोंदणी केल्यानंतर आपल्याकडील रिक्तपदे अधिसूचित करुन संकेतस्थळावर दि. 10 जुलै 2025पर्यंत अधिसूचित करावीत.

संकेतस्थळावर नवीन नोंदणी करणे व रिक्तपदे अधिसूचित करणे या संदर्भात आपणास काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा श्री. महेश भा.वखरे, लिपिक-टंकलेखक यांचे 9421613757 या भ्रमनध्वनी क्रमांकावर वर संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

करवीर हायकर्स’ च्या सातजणांची तिरंगा फडकवून,संविधान उद्देशिका प्रदर्शनाने एवरेस्ट बेस कँप’ यशस्वी… 

vishwatmaklokswamivarta

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी § मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

विधिमंडळ अधिवेशन कामकाज विधानसभा प्रश्नोत्तर -सीसीटीव्ही प्रकल्पांमध्ये एकसंधता आणण्यासाठी विशिष्ट कार्यप्रणाली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आज नरिमन नगर येथे अक्कलकोट स्वामी महाराज प्रगट दिन निमित्त मंदिरात भक्तांनी घेतले दर्शन घेतला तीर्थप्रसादाचा लाभ झाला कार्यक्रम संपन्न

27 ते 30 सप्टेंबर कालावधीत पाठ्यपुस्तक मंडळांची सर्व व्यवहार बंद

vishwatmaklokswamivarta

INS सतलज’ने मॉरिशसमध्ये जलमापन सर्वेक्षण मोहीम केली पूर्ण

vishwatmaklokswamivarta