vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यात लवकरच नवे धोरण– मंत्री उदय सामंत

घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यात लवकरच नवे धोरण– मंत्री उदय सामंत

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात ग्रामपंचायतींपासून ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाच्या अडचणी लक्षात घेऊन लवकरच व्यापक धोरण लागू करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य प्रज्ञा सातव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. यावेळी सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, निरंजन डावखरे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

मुंबईत दररोज सुमारे सात हजार मेट्रिक टन कचरा तयार होत असल्याचे सांगून मंत्री श्री. सामंत म्हणाले की, देवनार डम्पिंग ग्राउंडवरील १९३० पासून साचलेला कचरा हटवून ती जागा मोकळी करण्याचे काम सुरू असून, कांजूरमार्ग हा त्यासाठी पर्यायी उपाय ठरत आहे. ट्रान्सपोर्ट समस्या आणि कचरा रस्त्यावर पडण्याच्या तक्रारी सर्वच महापालिकांमध्ये आहेत. त्यामुळे नवीन धोरणात कचरा वाहतुकीच्या अडचणींचा देखील समावेश करण्यात येईल, असे मंत्री श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, महालेखा नियंत्रकाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अंमलबजावणी केली जात असून, भविष्यात डम्पिंगऐवजी कचऱ्यावर आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचाही विचार राज्य शासन करत असल्याचेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

 

०००००

संबंधित पोस्ट

बंदरे विभागाने लोकाभिमूख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा- बंदरे मंत्री नितेश राणे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात आगमन* *पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून स्वागत*

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव!… हा तर भारताला पुन्हा तेजस्वी बनवण्याचा आणि सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेचा जागर! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने वंदेमातरम् गीताची १५० वर्षपूर्ती साजरी वंदेमातरम् गीताचे वंदेमातरम् हे दोन शब्द ऐकताच राष्ट्रभक्ती जागृत होते – माजी आमदार कैलास गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केला विजयाचा संकल्प: हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन !रामराज्य स्थापनेसाठी देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी, तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात ४५ हून अधिक ठिकाणी, सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!

प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळ्यामध्ये आज चौथं शाही स्नान संपन्न

vishwatmaklokswamivarta