vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ज्येष्ठांच्या मदतीसाठी १४५६७ हेल्पलाईन

ज्येष्ठांच्या मदतीसाठी १४५६७ हेल्पलाईन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ राष्ट्रीय हेल्पलाईन ही सेवा सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात वयोवृद्धांसाठी सुरू करण्यात आली आहे.

ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेल्या या हेल्पलाईनवर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक कॉल्स आले असून ३० हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर मदत करण्यात आली आहे.

हेल्पलाइनद्वारे मिळणाऱ्या मोफत प्रमुख सेवा:· माहिती: आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह व वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, याबाबत माहिती.· मार्गदर्शन: कायदेविषयक, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७.

 भावनिक आधार – मानसिक आजार व चिंता, ताण, राग इत्यादी व्यवस्थापन.बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत आणि पुनर्वसन, कुटुंबीयांशी संवाद, पोलिस प्रशासनाशी समन्वय, समुपदेशन.ज्येष्ठांसाठी असलेल्या १४५६७ या हेल्पलाईन सेवेचा वृद्ध नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात 21 ते 24 मे 2025 दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता. पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज (IMD)

अंकित राठोडने लॅब मास्टर चॅम्पयनशिपमध्ये स्पर्धत सर्वप्रथम क्रमांक पटकावला  १५ विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला

पोलीस पाटील भरती परीक्षेच्या उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा जिल्हा दौरा

vishwatmaklokswamivarta