vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पीक विमा उतरवला नाही म्हणूनशेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही- राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

पीक विमा उतरवला नाही म्हणूनशेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही- राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

मुंबई, प्रतिनिधी: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई म्हणून मदत दिली जाते. नुकसान झाले तर विमा कंपनीवर अवलंबून न राहता शासनामार्फत मदत दिली गेली पाहिजे, ही शासनाची भूमिका असून पीक विमा उतरवला नाही म्हणून शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, असे कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सांगितले.सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या पीक विमा रकमेबाबत प्रश्न विचारला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री ॲड.जयस्वाल म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील यापूर्वी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या पीक विम्यासंदर्भात भरपाई दिली गेली आहे. उर्वरित 69,954 विमा अर्जांसाठी 81.80 कोटी इतकी अतिरिक्त विमा नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम येत्या 3 ते 4 दिवसात वित्त विभागाकडून दिली जाईल, असे राज्यमंत्री ॲड.जयस्वाल यांनी यावेळी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची – राज्यपाल जिष्णू देव वर्मा,महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३९ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित-शाश्वत शेतीसाठी सर्व घटकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

आपला पैसा आपला अधिकार योजनेचा लाभ घ्यावा- अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने

vishwatmaklokswamivarta

कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित; प्रशासन सज्ज,चोख बंदोबस्त,अफवांवर विश्वास ठेवू नका-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

वसई महापालिकेच्या हद्दीतील बर्डपार्क उभारण्याची कार्यवाही करावी – पालकमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे दि.२२ रोजी लोकअदालत