vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई, प्रतिनिधी: मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात येतील. शासन कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही. जर अधिकारी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचे आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

 याबाबत सदस्य पराग अळवणी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य सर्वश्री योगेश सागर, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, वरुण सरदेसाई, मुरजी पटेल, अजय चौधरी, बाळा नर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.  उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतील अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन स्थगिती असल्यामुळे ती बांधकाम तात्पुरती शिल्लक राहिली आहेत. मात्र, न्यायालयाचे आदेश मिळताच तीही हटवली जातील.

सध्या पावसाळ्यामुळे काही ठिकाणी लोक वास्तव्यास असल्याने अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई करणे शक्य नाही. मात्र पावसाळ्यानंतर ती बांधकामेही निष्कासित केली जातील, असेही उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.  विलेपार्ले (पूर्व) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंड क्र. २५६ वर अनधिकृतरित्या शेड बांधण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर महानगरपालिकेकडून दिनांक २४ मार्च २०२५ रोजी या शेडवर तोडफोडीची कारवाई करण्यात आली.

त्यानंतर, संबंधित भूखंडावर अनधिकृत पार्किंगचे अतिक्रमण झाल्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली. या तक्रारीची दखल घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक ३ जून २०२५ रोजी त्या अतिक्रमणावर कारवाई करून अनधिकृत पार्किंग हटवले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, अनधिकृत बांधकामांवर एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई केली जाते. सदस्यांनी त्यांच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबत माहिती द्यावी. संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात येईल. अनधिकृत बांधकामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

****

संबंधित पोस्ट

नाशिक जिल्ह्यात ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी जमीनीचा प्रस्ताव सादर करा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सकारात्मक निर्णयामुळे अ‍ॅड.भास्कर मगरे यांच्या आंदोलनाला यश-अभिमन्यू खोतकर दलित आदिवासी भूमिहीन कासकारांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार- दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

एटापल्ली तालुक्यात उपजिविका विकास कार्यक्रमामुळे रोजगाराच्या संधी वाढणार*   – *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*     *एटापल्ली तालुक्यात बाएफ संस्थेमार्फत उपजिविका विकास कार्यक्रम*

नमुंमपा ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी व पालकांनी बनविलेल्या दिवाळी वस्तू व फराळ प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद….

vishwatmaklokswamivarta

मुंबई विमानतळाजवळ अद्ययावत अशी इनोव्हेशन सिटी विकसित करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta