vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विधानसभा लक्षवेधी :माथाडी कामगार बोगस नोंदणी तपासणीसाठी विशेष मोहीम- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

विधानसभा लक्षवेधी :माथाडी कामगार बोगस नोंदणी तपासणीसाठी विशेष मोहीम- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबई प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिह्यात ‘एमआयडीसी’मधील कंपन्यांमध्ये माथाडी कामगार नोंदणी तपासणीसाठी विशेष मोहीम राबली जाईल. या तपासणी मोहिमेत माथाडी कामगार बोगस नोंदणी झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कामगारांवर आणि अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

बोगस नोंदणी संदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य अभिजीत पाटील यांनी सहभाग घेतला.

कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेंद्रा ‘एमआयडीसी’ मधील कंपनीमध्ये माथाडी कामगारांच्या बोगस नोंदणी प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर याप्रकरणी नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात येईल. या प्रकरणातील १७ कामगारांपैकी ११ कामगारांनी राजीनामे दिले आहेत. चौकशी समितीच्या अहवालात जे कामगार दोषी आढळतील त्यांच्यावर आणि दोषी अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले जातील.

शासकीय गोदामातील नोंदीत माथाडी कामगारांच्या प्रलंबित अनुदान संदर्भात पुरवठा विभागासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असेही कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी

संबंधित पोस्ट

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांची आर्चबिशप हाऊस येथे पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली

संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलताई प्रदीपभाऊ खोमणे ह्या जिल्हा परिषद सर्कल खंडाळी येथून विजयी झाल्याबद्दल मा. श्री. भास्कर आबा दानवे, नगरसेवक तथा भाजपा विधानसभा प्रमुख, जालना यांच्या हस्ते सत्कार

माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

आर्मेनियातील भारतीय दूतावास, टोवमास्यान फाउंडेशन आणि लुईसयोगा स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने #InternationalDayOfYoga2026 निमित्त १०८ सूर्यनमस्कारांच्या प्रेरणादायी सत्राचे आयोजन

शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षित, दीक्षित आणि योग्य नागरिक बनवावे : राज्यपाल आचार्य देवव्रत

vishwatmaklokswamivarta