vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक युवा कौशल्य विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

जागतिक युवा कौशल्य विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

         सांगली, प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत दि. 14 ते 16 जुलै या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

   याअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी बहुमूल्य योगदान दिलेल्या 24 प्रशिक्षण संस्थांचा गौरव करण्यात आला. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेंतर्गत सहाभागी झालेले महाविद्यालय, ग्रामीण भागात कौशल्य प्रशिक्षण सुरु करणारे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे, तसेच किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सहभागी असलेली प्रशिक्षण संस्था यांना जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द. क. देवळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.   जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विश्वासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबा नाईक महाविद्यालय येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे यंग प्रोफेशनल प्रवीण बनकर, समन्वयक धनंजय पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व कौशल्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, रोजगार मेळावा, महास्वयंम पोर्टल व एन.सी.एस पोर्टलवर उमेदवार नोंदणी व नोकरी शोध याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाचा 136 उमेदवारांनी लाभ घेतला.

     श्रीयश एज्युकेशन ट्रेनिंग इन्स्टिट्युट, मिरज या संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात सहायक आयुक्त द. क. देवळे यांनी विद्यार्थ्यांसाठी जागतिक युवा कौशल्य दिनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कार्यालामार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, रोजगार मेळावा इ. योजनांची माहिती दिली. तसेच यंग प्रोफेशनल प्रविण बनकर यांनी महास्वयंम पोर्टल व एनसीएस पोर्टल पोर्टलवर उमेदवार नोंदणी व नोकरी शोध याबबात माहिती दिली. या कार्यक्रमाचा 49 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

 तसेच जिल्ह्यातील नोंदणीकृत प्रशिक्षण संस्थांमध्ये जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. युवा विकास सोसायटी, खंबाळे, नवोदय कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान, वाळवा, मायक्रोटेक कम्प्युटर, पलूस, सिध्दविनायक ट्रेनिंग सेंटर विटा, क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड महाविद्यालय, कुंडल, आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, पलूस व इतर प्रशिक्षण संस्थांमधून हस्तकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, करिअर मार्गदर्शन, Youth Empowerment through AI and Digital Skills- या विषयावर गेस्ट लेक्चर तसेच कौशल्य शिक्षणाची गरज आणि आजच्या काळातील त्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

वाहन चालकांसाठी मोठी बातमी -वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

100 दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत जिल्ह्यामध्ये 16 हजार 903 घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजन सोहळा

जिल्ह्यात पुरेसा जलसाठा उपलब्ध; पाटबंधारे विभागाची माहितीअफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पदवीधर मतदार संघ मतदार यादीमध्ये18 डिसेंबरपर्यंत नाव नोंदविता येणार· दावे व हरकती दाखल करण्यासाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta

बातमी प्रसिद्धीचा राग मनात धरुन पत्रकार विष्णु कदम यास मारहाण करणार्‍यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीसीएमची मागणी

vishwatmaklokswamivarta