vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रायगड जिल्ह्याच्या प्रगतीत बँक ऑफ इंडियाचा मोठा वाटा-जिल्हाधिकारी किशन जावळे*

रायगड जिल्ह्याच्या प्रगतीत बँक ऑफ इंडियाचा मोठा वाटा-जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड प्रतिनिधी-बँक ऑफ इंडियाच्या रायगड विभागातर्फे अलिबाग येथे किसान दिन मोठ्या उत्साहात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थिती त साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती ,शासकीय योजना आणि बँकेच्या योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन केले.

 बँक ऑफ इंडिया तर्फे बँक राष्ट्रीयीकरणाच्या स्मृती प्रित्यर्थ १९ जुलै हा दिवस किसान दिवस किसान दिवस आणि जुलै महिना किसान माह म्हणून साजरा केला जातो.या दिवशी बँकेच्या भारतातील आणि रायगड जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये शेतकरी, कष्टकरी आणि महिला यांचा सन्मान करून त्यांना कर्ज वाटप केले जाते. या कार्यक्रमास मुख्य महाव्यवस्थापक (CGM)

 सुनील शर्मा, एफ.जी.एम.ओ. मुंबई श्रीमती दीपान्विता साहनी-बोस, विभागीय व्यवस्थापक, रायगड विभाग,प्रकल्प संचालक, श्रीमती प्रियदर्शिनी मोरे, उप विभागीय व्यवस्थापक बिरेन चटर्जी,उप विभागीय व्यवस्थापक भरत सहाय, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक , रायगड विजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

बँक ऑफ इंडिया ही फक्त नावाला रायगड जिल्ह्याची अग्रणी बँक नसून सर्व कामात पहिल्या क्रमांकावर राहणारी बँक आहे असे कौतुक जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत लाभ घेतलेल्या व मृत्यु पावलेल्या 2 लाभार्थीच्या वारसदारास 2- 2 लाख रुपायाच्या धनादेशचे वाटप करण्यात आले.

मुख्य महाव्यवस्थापक सुनील शर्मा यांनी कृषी वित्त पुरवठ्यासाठी बँकेचा पाठिंबा आणि तयारी असल्याचे सांगताना बँकेच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थिताना केले त्याच बरोबर जिल्हा प्रशासन बरोबर योग्य समन्वय राखून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना राबवण्यात बँक ऑफ इंडिया नेहमीच अग्रेसर राहील याबाबत उपस्थितांना आश्वासन दिले.

विभागीय व्यवस्थापक श्रीमती दीपन्विता सहानी बोस यांनी उपस्थितांचे स्वागत करून कृषी, एम.एस.एम.ई. आणि रिटेल फायनान्स मधील बँकेची भूमिका आणि शासकीय योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी दिलेल्या समर्थनाबद्दल सविस्तर माहिती दिली.

प्रकल्प संचालक श्रीमती मोरे यांनी जिल्ह्यातील बचत गट (SHG) वित्तपुरवठ्यात बँक ऑफ इंडियाच्या 80% पेक्षा जास्त योगदानाचे कौतुक केले.मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वाटप करण्यात आली.अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विभाग प्रमुख सुधिर गायकवाड यांनी केले.

संबंधित पोस्ट

धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक

शासकीय आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

vishwatmaklokswamivarta

पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी MH46DH ही नवीन मालिका,पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज सादर करावेत

रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत सन्मान व समारोप समारंभ संपन्न

भाजपच्या संकल्प मेळाव्याला व सत्कार सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा… 🎊

vishwatmaklokswamivarta

पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन…