vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नक्शा प्रकल्पः कन्नड नगरपालिका हद्दीत मोजणीसाठीमालमत्ताधारकांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नक्शा प्रकल्पः कन्नड नगरपालिका हद्दीत मोजणीसाठीमालमत्ताधारकांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

  छत्रपती प्रतिनिधी प्रतिनिधी- नक्शा या प्रकल्पाअंतर्गत कन्नड नगरपालिका हद्दीत पथदर्शी प्रकल्प राबविण्यत येत आहे. याअंतर्गत ड्रोनद्वारे जमिनीचे सर्व्हेक्षण झाले आहे. आता मालमत्ताधारकांनी भूमापनासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे

नक्शा या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. भूमिअभिलेख अधीक्षक विजय वीर, तहसिलदार विद्याधर कडवकर, उप अधीक्षक भुमि अभिलेख कैलास निसाळ, रचना सहा. योगेश सहज, प्रकल्प समन्वयक मनोज पगारे, गणेश उंभरे आदी उपस्थित होते.

कन्नड येथे देशातील पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. ड्रोन मोजणीनंतर भूमापन कामाची सुरुवात होत आहे. त्यासाठी दि.१६ रोजी नोटीसीद्वारे नागरिकांना सुचित करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक मालमत्ताधारकास प्रॉपर्टी कार्ड, सनद दिली जाणार आहे. हे काम २६ डिसेंबर अखेर पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी सर्व मोजणी वेळेत पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

०००००

 

संबंधित पोस्ट

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत अमरावतीची बाजी,विजेत्यांच्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार चार विजेत्यांनी उंचावला जिल्ह्याचा नावलौकिक…

vishwatmaklokswamivarta

बम बम भोलेनाथ बाबा अमरनाथ यात्रेची नोंदणी येत्या १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

दहिपुरी मध्ये आज सत्यभामा सिताराम हनवते परिवाराकडून गरजूंना पंधरा किटचे वाटप.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

आयुष्मान कार्ड’ ऑनलाइन काढण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती व भटक्या जमाती उमेदवारांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta