vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळ विकासाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा

छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळ विकासाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा

सांगली, प्रतिनिधी : शिराळा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्मृतीस्थळ विकासाचा आढावा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सांगली महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. डी. मुधाळे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सुनिल भोकरे, शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिराळाचे उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले, यांच्यासह शासकीय अधिकारी आदि उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळ विकास आराखड्यातील कामे कालमर्यादेत वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यासाठी वन विभागासह आवश्यक परवानग्या प्राप्त करून घ्याव्यात. स्मृतीस्थळ उभारण्याची कार्यवाही गतीने करून छत्रपती संभाजी महाराजांचे दर्जेदार स्मारक उभारावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या.

शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्मृतीस्थळ विकासासाठी राज्य शासन निर्णयानुसार जवळपास 13 कोटी 46 लाख रूपयांच्या विकास आराखड्यास मान्यता प्राप्त आहे. यामधील रक्कम व बाबनिहाय कामांचा आढावा घेऊन पालकमंत्री श्री. पाटील यांनी अनुषंगिक सूचना केल्या. स्मृतीस्थळ आराखड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, मुख्य प्रवेशद्वार, जीवनपट दर्शवणारा वाडा, स्वच्छतागृहे, विद्युतीकरण, अग्निशमन व्यवस्था, पार्किंग आदि बाबींचा समावेश आहे

दरम्यान यावेळी माजी मंत्री दिवंगत शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकाच्या कामासंदर्भातही आढावा घेण्यात आला.

0000

संबंधित पोस्ट

कृत्रिम वाळू युनिट स्थापन करणाऱ्यांसाठी संधी;6 मार्चला विशेष मार्गदर्शन सभेचे आयोजन

नागपूर स्पोर्ट्स हब” विहित वेळेत उभारणार कामचा दर्जा, गुणवत्ता राखावी- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील १०१३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर*

मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्टच्या पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रीक बसगाड्यांचे लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

आफ्रिकेच्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावांच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय इबोला विषाणू रोगाच्या बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

vishwatmaklokswamivarta