vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा स्पर्धेतीलयशस्वी कार्यालयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा स्पर्धेतीलयशस्वी कार्यालयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

सांगली, प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या 100 दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम दुसरा टप्पा अंतर्गत स्पर्धेतून निवड झालेल्या जिल्ह्यातील पाच जिल्हास्तरीय व 15 तालुकास्तरीय कार्यालय प्रमुखांना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे तहसिलदार सर्वसाधारण लीना खरात, स्पर्धेत यशस्वी कार्यालयांचे कार्यालय प्रमुख आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यालय प्रमुखांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आला.

या कार्यालयांना प्रशस्तीपत्र प्रदान,जिल्हास्तरीय कार्यालय – जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, वरीष्ठ भू-वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी, वस्तु व सेवा कर कार्यालय, उप प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (सर्व कार्यालय, सांगली)

तालुकास्तरीय कार्यालय – उपविभागीय अधिकारी मिरज, तहसिल कार्यालय, मिरज, उपअधिक्षक भूमी अभिलेख, वाळावा, पंचायत समिती शिराळा, उपविभागीय पोलीस अधिकारी विटा, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिराळा, बालसंरक्षण अधिकारी, जत, सहायक पशुसंवर्धन आयुक्त, तालुका लघु, पशु सर्व चिकित्सालय, इस्लामपूर, नगरपरिषद विटा, उप अभियंता (जलसंपदा), उपविभाग क्रमांक 11 विटा, उपअभियंता जलसंपदा, वारणा पाटबंधारे उपविभाग, कोडोली तालुका शिराळा, उपविभागीय जलसंधारण अधिकारी जत, ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहाकाळ, ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालय, भिवघाट, गट शिक्षण अधिकारी कडेगाव

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्यातील शाळांना बारा दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.झाडे लावा झाडे जगवा… पर्यावरणाचा समतोल राखा…

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश*  

नेपाळमध्ये अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा – जिल्हा प्रशासन तर्फे आवाहन*

सामाजिक समता सप्ताहानिमित्त “महिला मेळावा” व “संविधान जागर आणि महिला सक्षमीकरण” विषयावर व्याख्यान संपन्न

पंतप्रधानांच्या हस्ते मिझोराम रेल्वे मार्गाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta