vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण आज सायंकाळी ओसंडून वाहू लागले…

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण आज सायंकाळी ओसंडून वाहू लागले…

मुंबई प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण आज सायंकाळी ओसंडून वाहू लागले. मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सात प्रमुख जलाशयांपैकी एक असलेल्या या धरणाचा साठा पूर्ण क्षमतेपर्यंत भरल्याने ही आनंददायक बाब मानली जात आहे.

मुंबईसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या एकूण सात जलाशयांमध्ये तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, वरची वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या धरणांचा समावेश होतो. आज सकाळी सहा वाजेपर्यंतच्या माहितीप्रमाणे या सर्व जलाशयांमधील एकत्रित पाणी साठा छप्पण दशांश अठ्ठ्याऐंशी टक्के इतका झाला आहे

काल  सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी तानसा धरणातून पाणी वाहू लागल्याची नोंद झाली. याआधी मोडक सागर धरण 9 जुलै रोजी आणि मध्य वैतरणा धरण 7 जुलै रोजी ओसंडले होते.

तानसा धरणाची एकूण जलधारण क्षमता चौदा हजार पाचशे आठ कोटी लिटर इतकी आहे. या वर्षी अपेक्षेपेक्षा लवकर पावसाने जोर धरल्यामुळे धरण क्षेत्रात जलसाठा झपाट्याने वाढत गेला आणि अखेर आज धरण पूर्ण भरून वाहू लागले.

पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे जलसाठा लवकर भरू लागला आहे. परिणामी, यंदा मुंबईसाठी पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता अत्यंत कमी असून नागरिकांसाठी ही  दिलासादायक बाब आहे.

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्याच्या प्रगतीचा गौरवशाली टप्पा : ‘रायझिंग जालना’ कार्यक्रमाचे आयोजन  • जालना जिल्ह्याच्या 45 वर्षांच्या वाटचालीतील उल्लेखनीय कामगिरी, विकास        आगामी योजनांचे सादरीकरण • ‘गरजा महाराष्ट्र’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन • विविध विभागाचे 50 हून अधिक स्टॉल्स

आनंदवन येथील बाबा आमटे यांच्या संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून3 कोटी 8 लाखांचा निधी…

vishwatmaklokswamivarta

अभिजात मराठी भाषा सप्ताहः विश्वकोश मंडळातर्फे भूविज्ञान नोंद लेखन कार्यशाळा,जनसामान्यांना पृथ्वीविषयी सोप्या भाषेत माहिती द्या-डॉ.मिलिंद दुसाने

जिल्हाधिकाऱ्यांकडून चिया सिड उत्पादन, अन्नप्रक्रिया, मत्स्य व्यवसायाची पाहणी*उत्पादनाच्या ब्रँडींगवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

राज्यातील जनतेला रमजान ईदच्याशुभेच्छा,मानवकल्याण, विश्वबंधुत्वासह सामाजिक ऐक्याचा संदेश जगाला देऊया – उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार 

सत्ता आमची लालसा नसून समाज संघटन आमचे उद्दिष्ट आहे – आ.संजय केनेकर